इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने १३ एप्रिल १९१९मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणले. जनरल डायरच्या हुकुमावरून लष्कराने नि:शस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश होता. या हत्याकांडामध्ये अंदाधुंद गोळीबारात शेकडो निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. इतिहासात ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या हत्याकांडातील हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी यासंदर्भात त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया ‘X’द्वारे पोस्ट लिहिली आहे. (Jallianwala Bagh Massacre)
सोशल मिडियावरील पोस्टमध्ये मोदींनी, “देशभरातील माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या वतीने, मी जालियनवाला बाग हत्याकांडातील सर्व शूर हुतात्म्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो”, असे म्हटले आहे.
राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली…
जलियांवाला बाग नरसंहार के सभी वीर शहीदों को देशभर के मेरे परिवारजनों की ओर से कोटि-कोटि नमन। pic.twitter.com/Ow1jtjXdd0
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2024
त्याचप्रमाणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही हत्याकांडातील पीडितांचे स्मरण केले आहे आणि म्हटले की, “जालियनवाला बागेमध्ये मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व महान आत्म्यांचे देशवासी सदैव ऋणी राहतील. मला खात्री आहे की, त्या हुतात्म्यांची देशभक्तीची भावना येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देईल “.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून म्हणाले,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या जालियनवाला बाग हत्याकांडातील शूर हुतात्म्यांना श्रद्धांजली. “जालियनवाला बाग हे ब्रिटिश राजवटीतील क्रूरता आणि अमानवीपणाचे जिवंत प्रतीक आहे. या हत्याकांडाने देशवासीयांच्या हृदयात लपलेली क्रांतिकारी ज्योत जागृत केली आणि स्वातंत्र्य चळवळीला जनतेचा संघर्ष बनवले. जालियनवाला बागे हत्याकांडातील हुतात्मे प्रथम देशासाठी बलिदान आणि समर्पणासाठी प्रेरणा देणारे शाश्वत स्रोत आहेत “, असे ते म्हणाले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही जालियनवाला बाग येथे लोकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community