Lok Sabha Election 2024 : ठाण्यात व्हीआयपी प्रचारासाठी ९ हेलिपॅड तयार; निवडणूक विभागाची परवानगी आवश्यक

221
Lok Sabha Election 2024 : ठाण्यात व्हीआयपी प्रचारासाठी ९ हेलिपॅड तयार; निवडणूक विभागाची परवानगी आवश्यक
Lok Sabha Election 2024 : ठाण्यात व्हीआयपी प्रचारासाठी ९ हेलिपॅड तयार; निवडणूक विभागाची परवानगी आवश्यक
निवडणुकीच्या कालावधीत प्रचारासाठी येणाऱ्या दिग्गज नेतेमंडळींचा वेळ आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करताना होणारी दगदग लक्षात घेत, हेलिकॉप्टरच्या (helicopter) वापरावर यावेळी विशेष भर दिला जाण्याची शक्यता जास्तच आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात एक- दोन नव्हेतर चक्क नऊ हेलिपॅड (Helipad) सज्ज ठेवण्यात आले आहेत. पण, यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. (Lok Sabha Election 2024)
हेलिकॉप्टर (helicopter) उड्डाण व उतरविण्यापूर्वी निवडणूक विभागाची (Election Department) परवानगी घ्या, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या परवानगीसाठी खास कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक विभागाने दिली. (Lok Sabha Election 2024)
प्रचार – उन्हाळा-दगदग
ठाणे जिल्ह्यात (Thane district) ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदान क्षेत्र मोडतात. ठाणे जिल्ह्याला राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री पद लाभलेले आहे. तर, केंद्रीय राज्यमंत्री देखील याच जिल्ह्यातील आहे. त्यामुळे जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकंदरीत तिन्ही ठिकाणी उमेदवारांनी प्रचाराचा श्री गणेशा केला असून बैठका, गाठीभेटी, चौक सभा आणि मेळावे घेण्यास सुरुवात देखील केली आहे. जसाजशी प्रचाराची रणधुमाळी वाढेल तसतसे ज्येष्ठ नेत्यांचे प्रचार सभांसाठी दौरे देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी नेत्यांना एकाच वेळी अनेक ठिकाणी जावे लागणार आहे. त्यातच उन्हाळा असल्याने दगदग मोठी होणार आहे. वाढत्या वाहनांमुळे कोंडीत अडकण्याची भीती आहे. गाडीतून प्रवासाला अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)
परवानगीसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना
दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगाने लागू असलेल्या आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी निवडणूक काळात या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उड्डाण आणि उतरविण्यासाठी निवडणूक विभागाची (Election Department) परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच ४८ तास आधी ते सात दिवसा आधी त्याची परवानगी घ्यावी लागणार असून त्यासाठी कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.