IPL 2024, Virat Gesture : हार्दिक ट्रोल होताना विराटने केलेल्या मदतीचं होतंय कौतुक

मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराटने प्रेक्षकांना ट्रोलिंग थांबवण्याची विनंती हात जोडून केली

198
IPL 2024, Virat Gesture : हार्दिक ट्रोल होताना विराटने केलेल्या मदतीचं होतंय कौतुक
IPL 2024, Virat Gesture : हार्दिक ट्रोल होताना विराटने केलेल्या मदतीचं होतंय कौतुक
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यासाठी मागेच तीन दिवस विराट कोहली (Virat Kohli) मुंबईत होता. आणि या कालावधीत विराटने हार्दिक पांड्याला दिलेला पाठिंबा आणि त्याच्यासाठी प्रेक्षकांना केलेली विनंती यामुळे विराटवर माजी खेळाडूंनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. खासकरून हरभजन सिंग आणि विरेंद्र सेहवाग विराटने दाखवलेल्या खिलाडू वृत्तीला वाखाणत आहेत. दोन दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात विराटने प्रेक्षकांना हात जोडून विनंती केली होती.

‘विराटने ज्या पद्धतीने लोकांना हार्दिकला ट्रोल करू नका, उलट त्याला पाठिंबा द्या, प्रोत्साहन द्या हे सांगितलं, यातून विराटची खिलाडू वृत्ती दिसली. कारण, तेव्हा नाही म्हटलं तरी हार्दिक प्रतिस्पर्धी कर्णधार होता. महान खेळाडूची ओळख विराटने पटवून दिली,’ असं हरभजन सिंग स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला.

(हेही वाचा – Mary Kom : मेरी कोमने पॅरिस ऑलिम्पिक पथकाची ‘शेफ द मिशन’ व्हायला नकार का दिला?)

तर विरेंद्र सेहवागही जिओ सिनेमाशी बोलताना विराटचं कौतुक करताना थकत नव्हता. ‘विराटने हात जोडून प्रेक्षकांना नम्रपणे विनंती केली. हार्दिकसाठी चिअर करा, असं तो म्हणाला. हे मोठ्‌या खेळाडूचं लक्षण आहे,’ असं विरेंद्र सेहवाग म्हणाला. गुरुवारी पुन्हा एकदा वानखेडे स्टेडिअमवर हार्दिकची हुर्यो उडवली गेली. यापूर्वी क्रिकेट समालोचक, मुंबई इंडियन्स संघातील हार्दिकचे सहकारी, माजी खेळाडू यांनी वेळोवेळी हार्दिक पांड्याला पाठिंबा दर्शवताना लोकांना ट्रोल न करण्याचं आवाहन केलं आहे. (IPL 2024)

मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यात रोहित आणि विराटच्या नावाचा गजर करणारे चाहतेही होते. पण, मध्येच हार्दिकच्या धिक्काराच्या घोषणाही झाल्या. पण, हार्दिक फलंदाजीला आल्यावर काही प्रेक्षक त्याच्या प्रत्येक षटकारावर आनंद व्यक्त करत होते. मुंबई इंडियन्स संघ प्रशासनाने गुजरातकडून लिलावाबाहेरच्या वाटाघाटींमध्ये हार्दिकला विकत घेतलं. आणि नंतर रोहितकडून नेतृत्व काढून घेऊन ते हार्दिककडे सोपवलं याचा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना सध्या राग आलाय. आणि तोच राग हार्दिकला सहन करावा लागल आहे. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.