महाविकास आघाडीतर्फे शरद पवार (Sharad Pawar) यांनी भिवंडी मतदारसंघातून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. पवारांची ही चाल भाजपाला व जुने सहकारी खासदार कपिल पाटील यांच्या विजयाची वाट मोकळी करण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांची पवार गटातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे आता अपक्ष उमेदवाराला मदत करण्याचा कल काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत. त्यादृष्टीने विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Eknath Shinde: अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाला तातडीने मदत करा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश)
भिवंडी लोकसभा राष्ट्रवादीला सोडल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हे जिव्हारी लागले आहे. भिवंडी मतदारसंघात आता काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे बंडखोरीच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे व त्यादृष्टीने त्यांनी तयारी केल्याचे दिसून येत आहे. मात्र पक्षातील काही पदाधिकारी काँग्रेसने आता निवडणूक लढवू नये, त्याऐवजी अपक्ष उमेदवाराला मदत करावी, अशी जाहीर भूमिका घेऊ लागले आहेत. (Lok Sabha Election 2024)
त्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळा मामा यांना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नसणार असल्याचे राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community