Iran vs Israel War : इराण-इस्रायलच्या युद्धात अमेरिका ‘उतरली’

चाहुल आणखी एका युद्धाची, अमेरिकेने इस्रायलमध्ये पाठवले युद्धावाहू नौका

353
इराण-इस्रायलच्या युद्धात अमेरिका ‘उतरली’

इराण आणि इस्रायलमध्ये (Iran vs Israel War) तनाव वाढत आहे. इराण येत्या २ दिवसांत इस्रायलवर हल्ला करू शकतो. असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका (अमेरीकन battleship) इस्रायलला पाठवली आहे. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या (Times of Israel) वृत्तानुसार अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘USS ड्वाइट आयझेनहॉवर’ (USS Dwight Eisenhower) लाल समुद्रमार्गे इस्रायलला पोहोचत आहे. इराणने डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखण्यास ती सक्षम आहे. “युद्ध वाढू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचवेळी, अमेरिकन सैन्याची सुरक्षा वाढवण्यासाठी आम्ही मध्यपूर्वेत अतिरिक्त सैन्य पाठवत आहोत.” असे विधान एका संरक्षण अधिकाऱ्याने केले. (Iran vs Israel War)

(हेही पाहा – Raj Thackeray: वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट; नेमकं कारण काय ? )

इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी

भारतासह ६ देशांनी – अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि जर्मनी यांनी त्यांच्या नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये नागरिकांना इराण आणि इस्रायलमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ०१  एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील इराणी दूतावास जवळ हवाई हल्ला (Attack Iranian embassy) केला. यामध्ये इराणच्या दोन सर्वोच्च लष्करी कमांडरसह १३ जण मारले गेले. यानंतर इराणने बदला म्हणून इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. (Iran vs Israel War)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ठाण्यात व्हीआयपी प्रचारासाठी ९ हेलिपॅड तयार; निवडणूक विभागाची परवानगी आवश्यक)

New Project 21

हल्ला करू नका ; जो बायडेन यांचा इराणला इशारा 

इराण आणि इस्रायलचचे शत्रुत्व सर्वश्रुत आहेत. दरम्यान, शुक्रवारी उशिरा रात्री अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाबाबत इराणला इशारा दिला. म्हणाले आम्ही इस्रायलचे रक्षण करू, हल्ला करू नका. आमचा इस्रायलला पाठिंबा आहे. इराण आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होणार नाही. असे ही बायडेन म्हणाले. (Iran vs Israel War) 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.