आधीच्या रासायनिक संवर्धनामुळे कोल्हापुरातील Shri Mahalaxmi मूर्तीचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करा

यापूर्वी वर्ष २०१५ पासून अनेकदा करण्यात आलेल्या संवर्धनातून काहीही साध्य होत नसतांना आता पुन्हा मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे.

185

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठापैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी (Shri Mahalaxmi) देवीच्या मूर्तीवर अनेकदा रासायिक संवर्धन करण्यात आले आहे. या सर्व संवर्धनामुळे मूर्तीची स्थिती गंभीर होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. असे असतांना आता पुन्हा एकदा १४ आणि १५ एप्रिलला भारतीय पुरातत्व विभागाकडून श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. प्रथम या रासायनिक संवर्धनामुळे पुन्हा श्री महालक्ष्मीदेवी मूर्तीची हानी झाली अथवा काही गडबड झाली, तर त्याची पूर्ण जबाबदारी निश्‍चित करावी, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांना देण्यात आले. या प्रसंगी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती संतोष गोसावी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासणे, अंबाबाई भक्त समितीचे प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे आणि शिवानंद स्वामी हे उपस्थित होते.

(हेही वाचा PM Narendra Modi: भोपाळच्या मशिदीत ‘मोदी है तो मुमकीन है’च्या घोषणा; भाजपसाठी बोहरा मुस्लिम समाज का महत्त्वाचा?)

संवर्धानामुळे मूर्तीची हानी 

या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, यापूर्वी वर्ष २०१५ पासून अनेकदा करण्यात आलेल्या संवर्धनातून काहीही साध्य होत नसतांना आता पुन्हा मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. वर्ष २०१५ मध्ये झालेल्या संवर्धनामुळे मूर्तीवर गंभीर परिणाम झाले आहेत, असा स्पष्ट अहवाल आहे. त्यामुळे आता जे संवर्धन होणार आहे त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याची नेमकी जबाबदारी निश्‍चित करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी. याअगोदर ज्यांच्यामुळे मूर्तीची (Shri Mahalaxmi) हानी झाली त्या सर्व संबंधितांवर गुन्हे नोंद करावेत, तसेच मूर्तीचा मुद्दा हा धार्मिक मुद्दा असल्याने त्या संदर्भात संदर्भात संत, धर्माचार्य, शंकराचार्यांचे विविध पीठ आदींचे मार्गदर्शन घ्यावे.

पुरातत्त्व खाते सर्वस्वी जबाबदार असेल

हिंदु जनजागृती समितीने मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतरही वर्ष २०१५ मध्ये श्री महालक्ष्मीदेवीच्या (Shri Mahalaxmi) मूर्तीचे रासायिक संवर्धन करण्यात आले. पुरातत्व विभागाने केलेल्या रासायनिक प्रक्रियेतील फोलपणा वर्ष २०१७ मध्येच दिसण्यास प्रारंभ झाला आणि मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले. त्या वेळीही परत एकदा रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. नुकतेच पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर्.एस्. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी मूर्तीच्या (Shri Mahalaxmi) संदर्भात न्यायालयात सादर केलेल्या अहवालात श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली असून ती झीज २०१५ या वर्षी झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे, असे नमूद केले आहे. वर्ष २०१५ मध्ये जेव्हा रासायनिक संवर्धन करण्यात आले तेव्हा मूर्तीच्या रासायनिक संवर्धनानंतर मूर्तीच्या स्थितीस प्रक्रिया करणारे पुरातत्त्व खाते सर्वस्वी जबाबदार असेल, असे माननीय जिल्हाधिकार्‍यांनी त्या वेळी सांगितले. असे असतांना ९ वर्षानंतरही मूर्तीच्या स्थितीस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही ?, असेही मंदिर महासंघाने विचारले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.