विशेष प्रतिनिधी,मुंबई
दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील भुयारी मार्गाचा (CSMT Subway) कायापालट करून त्याचे नुतनीकरण करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. मागील १५ ते २० दिवसांपासून या भुयारी मार्गाची डागडुजी सुरु आहे. मात्र, या कालावधीत अनेक सार्वजनिक सुट्टया असल्याने सरकारी तसेच खासगी कार्यालये बंद होती. त्यामुळे लोकांची तसेच प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने या भुयारी मार्गाचे काम विनाअडथळा करण्याची पूर्ण संधी असतानाच कंत्राटदाराकडून याचे काम विलंबाने केले जात आहे. त्यामुळे अर्धवट कामानंतरही हा मार्ग प्रवाशा तसेच पादचाऱ्यांसाठी खुला करून द्यावा लागत आहे. परिणामी आधीच विलंबाने काम आणि त्यातच अर्धवट कामांवरून पादचाऱ्यांची ये जा होत असल्याने या कामाची वाट लागली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पायऱ्या आणि भिंतींवरील टाईल्स तुटल्याने …
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भुयारी मार्गाच्या (CSMT Subway) नुतनीकरणासह अनेक पायऱ्या आणि भिंतींवरील टाईल्स तुटल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने घेण्याची मागणी होत होती. त्यानुसार महापालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी सुमारे कोटींहून अधिक रुपये खर्च केले जाणार आहे. महापालिकेने या कामांसाठी डी बी इन्फ्राटेक या कंपनीची निवड केली आहे.
(हेही वाचा – MCGM Bridge : छत्रपती शिवाजी टर्मिनस भुयारी मार्गाची होणार डागडुजी)
तब्बल आठ दिवस सार्वजनिक सुट्टीचा कालावधी
मागील २० दिवसांपासून या भुयारी मार्गाचे काम सुरु असून सर्व प्रथम महापालिका मुख्यालय (BMC) आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या दिशेला असणाऱ्या भुयारी मार्गावरील पायऱ्या तोडून आसपासच्या लाद्या तोडून नवीन लाद्या बसवण्याच्या कामाला सुरुवात केली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात याकामाला सुरुवात झाल्यानंतर तीन शनिवार आणि तीन रविवार तसेच मागील आठवड्यात ९ आणि ११ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी होती. त्यामुळे तब्बल आठ दिवस सार्वजनिक सुट्टीचा कालावधी मिळाल्यानंतरही कंत्राटदाराला याचे काम करता आलेले नाहीत तसेच महापालिकेच्या पूल (bridge) विभागाच्या अधिकाऱ्यांना हे काम त्यांच्याकडून तातडीने करून घेण्याचा प्रयत्न करता आलेला नाही.
काम निकृष्ट होण्याची भीती
भुयारी मार्गावरील या जिन्यावर नवीन पायऱ्या बसवून काही भागांमध्ये लाद्या लावून तेही काम अर्धवट सोडण्यात आले होते. त्या अर्धवट कामांमधून प्रवाशी तसेच पादचारी ये जा करत आहेत. परिणामी या लाद्या योग्यप्रकारे न बसता याचे काम निकृष्ट होण्याची भीती वर्तवली जात आहे.या जिन्याचे काम सुरु असल्याने प्रवाशांसह पादचाऱ्यांना दुसऱ्या जिन्याचा वापर करावा लागत आहे. परिणामी सकाळी आणि संध्याकाळी याठिकाणी गर्दी होऊन प्रवाशांना आपली गाडी पकडण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community