राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘मुळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार’ असा उल्लेख पवार घरातील सून आणि बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याबाबत केला. त्यावर नेटकऱ्यांनी शरद पवार यांना प्रचंड ट्रोल करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधीपासून प्रतिभाताईंपर्यंत प्रश्न उपस्थित केले.
शरद पवारांचा पलटवार त्यांच्यावरच उलटला
अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीच्या प्रचारसभेत ‘पवार आडनाव असेल तिथे मतदान करा’ असं आवाहन मतदारांना केले. त्यावर पलटवार करत शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘मुळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार’ हा मुद्दा काढला. मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यात फरक आहे, असे पत्रकार परिषदेत सांगून सुनेत्रा पवार यांच्यावर प्रश्न उपस्थित केला. मात्र त्यांचा हा पलटवार त्यांच्यावरच उलटला.
(हेही वाचा – Dharavi Redevlopment : सर्व धारावीकरांना घरे, अपात्र कुटुंबांना शासनाच्या भाडेतत्वावरील योजनेनुसार घरे)
लग्न होऊन ४० वर्षे, तरी सून बाहेरची?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनीही नाराजी व्यक्त करत लग्न होऊन ३०, ४०, ५० वर्षे होऊनही सून ही घरची नाही होत, तर ती बाहेरची राहते? असा सवाल केला. एका नेटकऱ्याने तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभाताईंवरच सवाल करत, “मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असे जर पवार कुटुंबात आहे तर मग आदरणीय सौ प्रतिभा पवार यांचे स्थान काय? काय बोलत आहेत, बुद्धी भ्रष्ट झाली आहे काय?” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘सोनिया गांधी पण सुनच
एका नेटकऱ्याने तर ‘सोनिया गांधी पण सुनच आहेत आपल्या देशाच्या .. त्याबद्दल काय काय विचार आहेत आपले’ असे म्हणत शरद पवार यांनी काँग्रेस सोडली त्याची काही कारणे होती त्यातील ‘सोनिया गांधी परदेशी आहेत’, असा एक मुद्दा होता, याची आठवण यानिमित्ताने झाली. ‘स्वतःच्या सुनेबद्दल असे बोलायची वेळ आलीय, हे दुसरं तिसरं काय नाय कर्माची फळ आहेत. आधी दुसऱ्यांच्या घरात भांडण लावली घरं फोडली आता स्वतः बसलेत घरातल्या घरात भांडत ..” अशी प्रतिक्रिया एकाने पोस्ट करून पवारांच्या वक्तव्यावर रंग व्यक्त केला.
(हेही वाचा – Rahul Gandhi : आमचे सरकार येताच अग्निवीर योजना बंद करणार; राहुल गांधी यांची घोषणा)
प्रतिभाताई पवार नाराज
एकाने तर ‘पवार साहेबांचा नवीन डाव, म्हणे पवार आणि बाहेरून आलेले पवार वेगळे, प्रतिभाताई पवार नाराज, माहेरी निघून जाण्याची दिली धमकी ‘ असे लिहून मराठी न्यूज चॅनेलला टॅगही केले. तर एकाने पवारकन्या सुप्रिया यांचा नामोल्लेख टाळत ‘लग्न झाल्यावर कोणती मुलगी नवऱ्याच्या घरी काम न करता बापाच्या कामात ढवळाढवळ करते, सांगा बघू? सुनेला लेक न मानणारा कौन? अशी प्रतिक्रिया पोस्ट केली. अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त करून आपला संताप व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community