मी इस्लामच्या नव्हे तर असदुद्दीन ओवैसीच्या विरोधात; Madhavi Latha

आमच्या देवांबद्दल ओवैसी का बोलता ? यापुढे कोणतेही आक्षेपार्ह टिप्पणी ऐकून घेणार नाही

254
मी इस्लामच्या नव्हे तर असदुद्दीन ओवैसीच्या विरोधात; Madhavi Latha

हैदराबाद लोकसभा २०२४ (Hyderabad Lok Sabha Election 2024) ची उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) माधवी लता यांना जाहीर झाली आहे. तर यांच्या विरोधात एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभा २०२४ च्या निवडणूक प्रचारासाठी उमेदवार माधवी लता आपल्या मतदार संघात प्रचार करत असून, त्यांच्यावर इस्लामविरोधी वक्तव्ये केल्याचा आरोप AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केला. (Madhavi Latha)

हेही वाचा –  Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या याचिकेवर 15 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

काय म्हणाल्या माधवी लता ?
मुस्लिम महिलांनी बुरखा घालू नये, तिहेरी तलाकाच्या (triple talaq) विरोधात उभे राहिले पाहिजे आणि बहूपत्नीत्वाला विरोध केला पाहिजे. असे माधवी लता यांनी हैदराबादमधील निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले होते. मी मुस्लिम महिलांना सशक्त बनण्याचा सल्ला दिला आहे. मुस्लीम पुरुषांनी एकापेक्षा जास्त विवाह करावेत असे ओवैसी का वाटते? असा खडा सवाल ही माधवी लता यांनी उपस्थित केला. (Madhavi Latha)

हेही वाचा – Rahul Gandhi : आमचे सरकार येताच अग्निवीर योजना बंद करणार; राहुल गांधी यांची घोषणा

यापुढे कोणतेही आक्षेपार्ह टिप्पणी ऐकून घेणार नाही 

दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना माधवी लता म्हणाल्या की, मी इस्लामविरोधात कोणतेही भाष्य केलेले नाही. तसेच असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या भावाने भगवान राम आणि माता सीता यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीची आठवण करून दिली. ते आमच्या देवाबद्दल नेहमी का बोलतात ? असा सवाल ही उपस्थित केला. यापुढे कोणतेही आक्षेपार्ह टिप्पणी ऐकून घेणार नाही. असं माधवी लता म्हणाल्या. (Madhavi Latha)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.