Onion Export Ban : कांदा निर्यात बंदीचे ४ महिने, शेतकरी चिडलेले

देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी सरकारने निर्यात बंदी लागू केली आहे.

174
Onion Export Ban : कांदा निर्यात बंदीचे ४ महिने, शेतकरी चिडलेले
Onion Export Ban : कांदा निर्यात बंदीचे ४ महिने, शेतकरी चिडलेले
  • ऋजुता लुकतुके

सध्या देशातील कांदा उत्पादक शेतकरी थोडा नाखुश आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कांदा निर्यातबंदीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) करुन ४ महिने पूर्ण झाले आहेत. अद्यापही सरकारनं निर्यातबंदी उठवली नाही. त्यामुळं सरकारनं तातडीनं निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करतायेत.

केंद्र सरकारनं कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ८ डिसेंबर २०२३ मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली होती. या घटनेला चार महिने पूर्ण झाले आहेत. या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. दरात मोठी घसरण झालीय. त्यामुळं कांद्याच्या निर्यातीवर बंदी उठवावी अशी मागणी केली जातेय. सध्या शेतकऱ्याच्या कांद्याला प्रतिकिलो पाच रुपयापासून १५ रुपयापर्यंतचा दर बाजारात मिळत आहे. निर्यातबंदीच्या पूर्वी कांद्याला बाजारात ४००० रुपयांचा दर मिळत होता. मात्र, निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याला ८०० ते १००० – २००० रुपयापर्यंतचा दर प्रतिक्विंटलला मिळत आहे. याचा मोठा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. (Onion Export Ban)

(हेही वाचा – Sharad Pawar यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल का केले?)

दरम्यान, सरकारनं कांद्याची निर्यातबंदी करताना ३१ मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) असल्याचं सांगितलं होतं. मात्र, ३१ मार्चला काही निर्यातबंदी उठवली नाही. पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याची माहिती सरकारनं दिली. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच विविध शेतकरी संघटनांनी देखील सरकारला इशारा दिलाय. लवकरात लवकर कांद्याच्या निर्यातीवरील बंदी (Onion Export Ban) उठवावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करु अशा इशारा संघटनांनी दिलाय.

पुण्याच्या बाजारात आज कांद्याला ५०० रुपये ते कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. तर सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे. तर कोल्हापूरच्या बाजारात कांद्याला ५०० ते १८०० रुपयांचा प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. म्हणजे सरासरी कांद्याला १२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. चंद्रपूरच्या बाजार समितीत कांद्याला १३०० ते २००० रुपयांचा दर मिळत आहे. तिथं सरासरी कांद्याला १५०० रुपयांचा दर मिळत आहे. म्हणजे सगळीकडील दराचा विचार केला तर सरासरी कांद्याला १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

(हेही वाचा – CSMT Subway : डागडुजीचे काम कासवगतीने, सार्वजनिक सुट्टीतही कामाला देता आला नाही वेग)

महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र, दरात सातत्यानं चढ उतार होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. कांद्याचा दर वाढला की सरकार निर्यातबंदी सारखे निर्णय घेते. मात्र, कांद्याचे दर कमी झाले की सरकार कोणताही निर्णय घेत नसल्याची भूमिका शेतकरी मांडत आहेत. दरम्यान, सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत. अशात सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्याही वस्तूचे दर वाढू नयेत अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळं सरकार कांद्याचे दर वाढू देत नाही. कारण दरवाढ झाल्यास निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. (Onion Export Ban)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.