तौक्ते वादळामुळे बॉम्बेहाय जवळील ओएनजीसीसह अन्य कंपन्यांच्या बार्ज वर काम करणाऱ्या सुमारे ६११ कामगारांची सुटका करण्यासाठी नौदलाने ३ दिवसांपासून दिवस-रात्र बचाव कार्य सुरु केले आहे. यातील ओएनजीसीचे बार्ज पी-३०५ हे बुडाल्याने यावरील २६१ कामगारांना ताबडतोब वाचवण्याचे आव्हान होते. नौदलाने त्यातील १८८ जणांना सुरक्षितपणे बाहेर वाढले आहे. मात्र या दरम्यान ३७ जणांचा मृत्यू झाला आहे, बेपत्ता कामगारांना शोधण्याचे काम अजूनही नौदलाने सुरूच ठेवले आहे.
#CycloneTauktae #Update #SAR P305
188 survivors & 37 Brave #NatureVictims #BNVs recovered so far. #INSKolkata disembarking survivors/BNVs at Mumbai. #INSKochi rejoins SAR efforts#IndianNavy ships & aircraft continue to search for the missing crew members. CG units join effort. pic.twitter.com/tnXVmJcg5i— SpokespersonNavy (@indiannavy) May 20, 2021
१७ मे पासून रेस्क्यू ऑपरेशन
नौदलाने १७ मे पासून कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. तेव्हापासून आतापर्यंत १८८ कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे. नौदलाच्या आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्धनौका, तसेच ग्रेटशिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. याशिवाय, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी जेएएल बार्जवर अडकलेल्या 137 कर्मचाऱ्यांचीही सुटका केली.
(हेही वाचा : पंतप्रधान महाराष्ट्राला १५०० कोटी देतील! संजय राऊतांच्या विश्वास )
२६१ कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या टाकल्या
चक्रीवादळामुळे सोमवारी बॉम्बे हायनजीक ‘पी ३०५’ हा बार्ज समुद्रात बुडाला. या बार्जवरील २६१ कर्मचाऱ्यांनी प्राण वाचविण्यासाठी जीवरक्षक जॅकेट परिधान करून समुद्रात उड्या मारल्या होत्या. त्यातील १८८ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. उर्वरित बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध मंगळवारी रात्रीपर्यंत लागला नव्हता. मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी दिवसभरात आठ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दलाला यश मिळाले. त्यातील सहा कर्मचारी ‘पी- ३०५’ बार्जवरील असून, दोघेजण ‘वरप्रदा’ नौकेवरील आहेत. ‘पी-३०५’ बार्जवरील ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले.
Join Our WhatsApp Community