Ambedkar Jayanti 2025 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता कलम ३७०ला विरोध !

आंबेडकर प्रत्यक्षात समान नागरी संहितेच्या बाजूने होते आणि काश्मीरच्या बाबतीत कलम ३७० ला विरोध करत होते.

411
Ambedkar Jayanti 2025 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता कलम ३७०ला विरोध !

भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांना आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) म्हणून ओळखतो. ते भारतीय विचारवंत, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्यांवरील सामाजिक भेदभावाविरुद्ध मोहीम चालवली. त्यांनी कामगार, शेतकरी आणि महिलांच्या हक्कांचे समर्थन केले. (Ambedkar Jayanti 2025)

बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य भारत प्रांत म्हणजे मध्य प्रदेशात झाला. आज या महामानवाची जयंती. डॉ. बाबासाहेबांनी चालवलेल्या अस्पृशोद्धार चळवळीविषयी चर्चा होते. मात्र त्यांच्या राष्ट्राविषयीच्या मतांकडे दुर्लक्ष केले जाते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांनी कलम ३७० काढून टाकण्यात आलम. ही खरंतर डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली होती; कारण आंबेडकरांनी ३७० ला विरोध केला होता. (Dr. Babasaheb Ambedkar)

(हेही वाचा – Iran Attack On Israel: इस्रायल-इराण संकटावर UN सुरक्षा पथकाची व्हाईट हाऊसमध्ये बैठक, नेतान्याहू म्हणाले…)

आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात समाविष्ट केलेल्या भारतीय संविधानाच्या कलम ३७० ला विरोध केला. बलराज मधोक यांनी सांगितले की, आंबेडकरांनी काश्मिरी नेते शेख अब्दुल्ला (Sheikh Abdullah) यांना स्पष्टपणे सांगितले होते: “भारताने तुमच्या सीमांचे रक्षण करावे, देशाने तुमच्या हद्दीत रस्ते बांधले पाहिजेत, तुम्हाला धान्य पुरवावे आणि काश्मीरला भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, असे तुम्हाला वाटते. परंतु भारत सरकारला फक्त मर्यादित अधिकार असले पाहिजेत आणि भारतीय जनतेला काश्मीरमध्ये कोणतेही अधिकार नसावेत, असे तुम्हाला वाटते. मी, भारताचा कायदा मंत्री या नात्याने, या प्रस्तावाला संमती दिली तर हे भारताच्या हिताच्या विरुद्ध ठरेल, देशद्रोह ठरेल, आणि असे कधीही होणार नाही. “

आंबेडकर प्रत्यक्षात समान नागरी संहितेच्या बाजूने होते आणि काश्मीरच्या बाबतीत कलम ३७० (Section 370) ला विरोध करत होते. आंबेडकरांना भारत हा आधुनिक, वैज्ञानिक विचारांचा आणि तर्कशुद्ध विचारांचा देश असाव असं वाटत होतं. १४ एप्रिल या आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण तर्कशुद्ध, वैज्ञानिक विचारांचा आधुनिक भारत घडवण्याची शपथ घेऊया. हीच या महामानवाला श्रद्धांजली ठरेल. जय भीम! (Ambedkar Jayanti 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.