बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना रविवारी, (१४ एप्रिल) पहाटे ५च्या सुमारास घडली. या गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलिम खान (Salim Khan) यांना यापूर्वी अनेक वेळा पंजाबचा गँगस्टर लॉरेन्स बिस्नोईच टोळीकडून धमकी आलेली असताना या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या (Salman Khan) कुटुंबाची आणि निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Salman Khan)
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा वांद्रे पश्चिम येथे गॅलेक्सी अपार्टमेंट हा बंगला आहे. रविवारी, (१४ एप्रिल) पहाटे मोटारसायकलवरून २ अज्ञात व्यक्ती बंगल्याबाहेर आल्या आणि त्यांनी काही कळण्याच्या आताच सलमान खान (Salman Khan) यांच्या बंगल्याच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून ४ राउंड फायर करून पळ काढला. या गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिकानी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या वांद्रे पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी पोलिसांना गोळीबार केलेल्या ठिकाणी ४ निकामी काडतुसे सापडली. (Salman Khan)
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, पहाटे 5 वाजता घडली धक्कादायक घटना
.
.
.#Isreal #Iranian #WorldWar3 #UFC300 #AmbedkarJayanti #SalmanKhan #Palestine #LokSabaElection2024 #MaharashtraPolitics #MumbaiPolice #Mumbai #Hindusthanpost pic.twitter.com/lbOzIkMOwr— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) April 14, 2024
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेल्मेट घातलेले दोन इसम मोटारसायकलवरून आले होते, त्यांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy Apartment) दिशेने ४ राउंड फायर करून पळ काढला. ही घटना रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ च्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलेले असून या दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी मुंबई गुन्हे शाखेचे पथकदेखील दाखल झालेले असून गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. (Salman Khan)
(हेही वाचा- HC To Centre: सावंतवाडी-दोडामार्गला ‘ईएसझेड’ दर्जा द्या, उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश)
सलमान खानला (Salman Khan) पंजाबमधील काही माफिया गटांनी, प्रामुख्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीने लक्ष्य केले आहे. गेल्या काही वर्षांत, सलमान आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) या दोघांनाही कुटुंबाला धमकी देणारी पत्रे पाठवण्यासह विविध माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या घटनेदरम्यान सलमान खान नेमका कुठे होता हे अद्याप अस्पष्ट आहे. (Salman Khan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community