Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी ‘संकल्प पत्रा’ द्वारे केलेल्या घोषणांची हमी देत ‘X’द्वारे व्यक्त केल्या भावना; म्हणाले…

143
Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी 'संकल्प पत्रा' द्वारे केलेल्या घोषणांची हमी देत 'X'द्वारे व्यक्त केल्या भावना; म्हणाले...
Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी 'संकल्प पत्रा' द्वारे केलेल्या घोषणांची हमी देत 'X'द्वारे व्यक्त केल्या भावना; म्हणाले...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP)रविवारी, (१४ एप्रिल) दिल्लीत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. (Narendra Modi)

पीएम मोदींनी भाजपा मुख्यालयात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे संकल्प पत्र जारी केले. पंतप्रधान मोदी वारंवार सांगत आहेत की, त्यांच्या मते देशात फक्त ४ ‘जाती’ आहेत – तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. हे लक्षात घेऊन भाजपाच्या निवडणुकीतील आश्वासनांमध्ये समाजातील या ४ घटकांच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजनांचा समावेश आहे. २०४७पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात रोडमॅप सादर केला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले… 

पंतप्रधान मोदींनी रविवारी, (१४ एप्रिल) भाजपाचे संकल्पपत्र अथवा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यांचा अधिकृत ‘X’हॅंडलद्वारे आजच्या दिवसाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, “हा अतिशय पवित्र दिवस आहे. देशातील अनेक राज्ये ‘नववर्ष’ साजरा करत आहेत…आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपण माता कात्यायनीची प्रार्थना करतो. तिने दोन्ही हातात कमळ धरले आहे. आजच जाहिरनामा अर्थात संकल्प पत्र जाहीर होणं हा योगायोग एक मोठा आशीर्वाद आहे. त्याहूनही चांगले म्हणजे आज (रविवार, १४ एप्रिल) आंबेडकर जयंती आहे “.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.