Lok Sabha Election 2024: गृह मतदानासाठी वृद्ध मतदाराने केली पैशांची मागणी, निवडणूक अधिकाऱ्यांनी नाइलाजाने घेतली माघार 

202
PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?
PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?

वर्धा लोकसभा मतदारसंघातील मोर्शी तालुक्याच्या रिद्धपुरातील १७ लोकांनी गृह मतदानासाठी अर्ज केले. वृद्धांना गृह मतदानाची सोय असल्याने निवडणूक अधिकारी एका वृद्ध व्यक्तीच्या घरी गेले. तेव्हा वृद्ध व्यक्तीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. या प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू आहे.

मोर्शी येथील रिद्धपूर येथे १७ वृद्धांनी गृह मतदानासाठी अर्ज केले होते. गावातील १७ पैकी १४ जणांनी मतदान केले. एका मतदाराने मतदान करण्यास नकार दिला. निवडणूक विभागाचे अधिकारी शुक्रवारी, (१२ एप्रिल)एका वृद्धाच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केली. ‘पैसे दिले तरच मतदान करणार, असे या मतदाराने बजावले.’ त्यामुळे दुसऱ्या दिवशी शनिवारी, (१३ एप्रिल) निवडणूक अधिकाऱ्यांचे पथक पुन्हा रिद्धपूरला त्या वृद्धाच्या घरी गेले; पण तेव्हाही त्यांनी त्यांची पैशांची मागणी कायम ठेवली. अधिकाऱ्यांनी त्यांची बरीच समजूत काढली. तरीही ते त्यांच्या पैसे मागण्याच्या मागणीवर ठाम होते. ग्रामस्थांकडून ही माहिती गावभर पसरली. अखेर अधिकाऱ्यांना त्यांच्या घरून माघार घ्यावी लागली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदार जनजागृतीसाठी मुंबई ‌शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वाक्षरी मोहीम )

या घटनेला मोर्शीतील निवडणूक अधिकारी आर. एस. चांदेवार यांनी नकार दिला आहे. ते म्हणाले की, १७ पैकी १४ मतदारांनी मतदान केले. एका ८५ वर्षीय मतदाराने मतदान करण्यास नकार दिला, पण त्याने माझ्याकडून पैसे मागितले नाहीत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.