साहेब नाराज आहेत, पण…”; Vasant More राज ठाकरेंना भेटणार?

साहेब कदाचित नाराज आहेत, पाहू प्रयत्न करू पाहू

235
साहेब नाराज आहेत, पण..."; Vasant More राज ठाकरेंना भेटणार?

मी २५ वर्ष राजसाहेबांसोबत (Raj Thackeray) होतो, त्यामुळे मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन. महाराष्ट्र सैनिकही (mns) त्यातून मार्ग काढतील. वेळेनुसार पुढे गोष्टी घडतील, अजून प्रचाराला सुरुवात झालेली नाही. ३० तारखेनंतर प्रचाराची रणधुमाळी (Lok Sabha election 2024) सुरू होईल. त्यानंतर रणनीती ठरवल्या जातील. असे म्हणत वसंत मोरे यांनी मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे विधान केले आहे. (Vasant More)

(हेही वाचा – Railway Drinking Water : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना शुद्ध पाणी मिळणार ; मध्य रेल्वेने उचलली पावले)

मतभेद होतात, मनभेद नाहीत

वसंत मोरे म्हणाले की, राज ठाकरेंनी मदत केली तर चांगलेच आहे. माझे राज ठाकरेंचे जुने संबंध आहेत. मी २५ वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याचा विचार करू. विचारांशी फारकत घेतली आहे. माणसाचे मतभेद होतात, मनभेद नाहीत. माझे मनभेद झाले नाहीत तर मी विचारांशी फारकत घेतली आहे. जसजसं घोडेमैदान जवळ येईल तसतशी रणनीती आखली जाईल. साहेब पाठिंबा देतील की नाही हे मी सांगू शकत नाही. साहेब कदाचित नाराज आहेत, पाहू प्रयत्न करू असे वसंत मोरे यांनी म्हटले. (Vasant More)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.