दरवर्षी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) मुंबईसह दादर, विद्याविहार आणि कुर्ला या भागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५७ व्या आत्मार्पण स्मृती वर्षानिमित्त रविवार, 14 एप्रिल रोजी ठाणे येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हनुमान सेवा मंडळ (Hanuman Seva Mandal) यांच्या सहकार्याने हे शिबिर झाले. या वेळी लोकमान्य रुग्णालयातील ह्रदयरोग तज्ञांकडून गरजूंची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली. (Blood Donation Thane)
(हेही वाचा – Salman Khan House Firing : सलमान खानला मारण्याची धमकी 2 वेळा देणारा लॉरेन्स बिष्णोई कोण आहे ?)
५२ बाटल्या रक्तसंकलन
सकाळी १० ते दुपारी ३ या दरम्यान हे रक्तदान शिबीर हनुमान मंदिर, पोलीस चौकीसमोर, सावरकर नगर, रोड क्रमांक २२, ठाणे पश्चिम येथे झाले. ६ महिलांनी रक्तदान करण्यासाठी नाव नोंदविले होते, त्यांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्या महिला रक्तदान करू शकल्या नाहीत. या शिबिरात ५२ बाटल्या रक्त संकलन झाले.
या शिबिरास शिवसेनेचे दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचीही उपस्थिती लाभली. या वेळी सावरकर स्मारकाचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर आणि विश्वस्त कमलाकर गुरव, व्यवस्थापक संजय चेंदवणकर आणि कर्मचारी जयश्री पोरे हे उपस्थित होते. हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष संदीप सकपाळ, कुणाल मोरे आणि सागर सकपाळ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. हे रक्तदान शिबिर स्मारकाच्या वतीने घेण्यात आलेले २३वे शिबिर आहे, तर हनुमान सेवा मंडळ आणि स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आयोजनाचे हे ६ वे वर्ष आहे. (Blood Donation Thane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community