Kolhapur Hatkanangle Lok Sabha : संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापुरात भेटीगाठी

177
Kolhapur Hatkanangle Lok Sabha : संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापुरात भेटीगाठी
Kolhapur Hatkanangle Lok Sabha : संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापुरात भेटीगाठी

केंद्रात सक्षम सरकार हवे असेल, तर महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा. लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक असून देशाला दिशा देणारी आणि प्रगतीपथावर नेणारी अशी ही निवडणूक आहे. महापुरात मी इथे मदतीसाठी आलो होतो, तेव्हा कोल्हापूरकर नागरिकांची माणुसकी अनुभवली होती. कोल्हापुरातील (Kolhapur Lok Sabha) नागरिकांची वारंवार येणाऱ्या महापुरातून मुक्तता करण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 3 हजार 200 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. तसेच पंचगंगेचे प्रदूषण दूर करण्यासाठी 350 कोटी रुपये निधी दिला आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काढले. ते हातकणंगलेतील (Hatkanangle Lok Sabha) कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज्यातील 23 टक्के तृतीयपंथी मतदार ठाणे जिल्ह्यात)

कोल्हापुरातील शिवसेनेचे संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आणि धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे १५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित रहाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कोल्हापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आमदार विनय कोरे आणि समर्थक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचीही मनधरणी केली. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विनय कोरे हे सध्या महायुतीमध्ये असले, तरी त्यांनी अजूनही माने यांचा प्रचार म्हणावा तसा सुरू केलेला नाही. त्यामुळे शिंदे यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेत प्रचारामध्ये सक्रिय होण्याचे आवाहन केले.

राजू शेट्टी चौथ्यांदा बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी 15 एप्रिल रोजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापुरातील दसरा चौकातून ते बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत. राजू शेट्टी चौथ्यांदा हातकणगले लोकसभा मतदारसंघांमध्ये उभे आहेत. त्यांच्यासमोर तब्बल चार उमेदवारांचे आव्हान आहे. या मतदारसंघामध्ये काय होणार, याचे उत्तर 4 जून रोजीच मिळणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.