पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासन विविध उपाययोजना करत असते. दरवर्षी प्रमाणे यंदादेखील पावसाळापूर्व कामांचा निपटारा करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन वेगाने कामे करत आहे. त्याच अनुषंगाने पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने परिमंडळ १ अंतर्गत येणारी मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके तसेच परिसर आणि विभाग कार्यालयातील तयारीची नुकतीच पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यादरम्यान डी विभागातील ग्रॅंटरोड व चर्नीरोड स्थानक परिसरात पावसाळापूर्व कामे आणि विभागातील धोकादायक इमारतींचा उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे (Sangeeta Hassanale) यांनी आढावा घेतला. ३१ मे पूर्वी पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना संबंधित खात्यांना दिल्या. तसेच धोकादायक इमारतींना नोटीसा देऊन दुरूस्तीची कामे तत्काळ करून घ्यावीत, अशा सूचनादेखील यावेळी त्यांनी दिल्या.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात नुकतीच पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक घेतली होती. रेल्वे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात वेगवेगळ्या खात्यांमार्फत सुरू असलेली पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशदेखील आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सर्व संबंधित खात्यांना दिले आहेत. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, चर्नी रोड व ग्रँटरोड तसेच मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांबाबत काही मुद्दे रेल्वे प्रशासनाने या बैठकीत उपस्थित केले होते. त्याअनुषंगाने उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे (Sangeeta Hassanale) यांनी रेल्वे स्थानकांची पाहणी केली.
(हेही वाचा – Kolhapur Hatkanangle Lok Sabha : संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापुरात भेटीगाठी)
मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य आव्हानांवर महानगरपालिका (BMC) आणि रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने उपाय करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या स्थळ पाहणी दौऱ्यासाठी डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, रेल्वे अतिरिक्त विभागीय अभियंता ए. के. मिश्रा यांच्यासह डी विभागातील विविध खातेप्रमुख उपस्थित होते.
डी विभागातील ग्रॅंटरोड व चर्नीरोड स्थानक परिसरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीसा देऊन इमारत दुरूस्तीची कार्यवाही करावी. तसेच धोकादायक इमारतींबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना इमारत आणि कारखाने विभागाला उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे (Sangeeta Hassanale) यांनी दिल्या. तसेच रेल्वे रूळालगत असलेल्या सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता करून परिसरातील कचरा, राडारोडा उचलण्यात यावा. जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा येणार नाही. परिणामी नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे निर्देशही उपायुक्त डॉ. हसनाळे यांनी यावेळी दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community