IPL 2024, CSK bt MI : अल क्लासिको सामन्यात चेन्नईकडून मुंबईचा २० धावांनी पराभव

IPL 2024, CSK bt MI : महेंद्रसिंग धोणीने शेवटच्या ४ चेंडूंवर २० धावा केल्या. तेवढ्याच मुंबईला कमी पडल्या 

226
IPL 2024, CSK bt MI : अल क्लासिको सामन्यात चेन्नईकडून मुंबईचा २० धावांनी पराभव
IPL 2024, CSK bt MI : अल क्लासिको सामन्यात चेन्नईकडून मुंबईचा २० धावांनी पराभव
  •  ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांनी आतापर्यंत प्रत्येकी ५ वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे या दोन संघातील सामना ‘अल क्लासिको’ म्हणून ओळखला जातो. अशा या सामन्यात चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव केला. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर महेंद्र सिंग धोनीने (ms dhoni) शेवटच्या ४ चेंडूंत केलेल्या २० धावा चेन्नईला विजयासाठी उपयोगी पडल्या. कारण, चेन्नई संघातील सगळ्याच खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी योगदान दिलं. (IPL 2024, CSK bt MI)

(हेही वाचा- BMC : दुकानांच्या पाट्या मराठीतून न लावण्याची हिंमतच कशी होते?)

फलंदाजांनी कायम धावगती सरस ठेवली. कर्णधार ऋतुराज गायकवा़ड (Rituraj Gaekwad) (४० चेंडूंत ६९) आणि शिवम दुबे (Shivam Dubey) (३८ चेंडूंत नाबाद ६६) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९० धावांची भागिदारी केली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने (ms dhoni) मैदानात आल्या आल्या ४ चेंडूंत पहिले तीन षटकार आणि शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत चेन्नईला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. फलंदाजी आणि गोलंदाजीत चेन्नईचाच संघ वरचढ ठरला. मुंबईची भूमिका कायम चेन्नईचा पाठलाग करण्याची राहिली. त्यातच शेवटी मुंबईची दमछाक झाली. (IPL 2024, CSK bt MI)

खरंतर रोहित शर्मा (Rohit Sharma), इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी चांगली फलंदाजी करत मुंबईलाही विजयाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला. पण, शेवटी २० धावा कमी पडल्याच. रोहीतने ६३ चेंडूंत १०५ धावा करताना ५ षटकार खेचले. सुर्यकुमार यादव मात्र शून्यावरच बाद झाला. फलंदाजीतील हे अपयश मुंबईला भोवलं. (IPL 2024, CSK bt MI)

(हेही वाचा- Lok Sabha Elections 2024 : राजकारणाला जनता खरंच कंटाळली?)

चेन्नईच्या विजयात आणखी एका खेळाडूचं योगदान मान्य करावं लागेल. पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या रोहीत आणि इशानने सुसाट फलंदाजी सुरू केली होती. दहाची धावगती पहिल्या पाच षटकांत राखली होती. पण, ऋतुराजने सातव्या षटकांत पथिराणाकडे चेंडू सोपवला. आणि तिथे दोन संघांमधील खरा फरक उघड झाला. कारण, मुंबईचे गोलंदाज बळी मिळवण्यात अपयशी ठरले होते. ते स्लिंग गोलंदाज पथिराणाने केलं. (IPL 2024, CSK bt MI)

(हेही वाचा- भाजपचे ईशान्य मुंबई लोकसभा उमेदवार Mihir Kotecha यांच्या प्रचार रथाची तोडफोड)

इशान किशनला त्याने २३ धावांवर बाद केलं. त्यानंतर सुर्यकुमार यादव (०), तिलक वर्मा (३१) आणि रोमारिओ शेफर्ड (१) अशा धोकादायक आणि जम बसलेल्या खेळाडूंचे बळी त्याने मिळवले. पथिराणाने ४ षटकांत २८ धावा देत ४ गडी बाद केले. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. (IPL 2024, CSK bt MI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.