Praful Patel: ४ जूननंतर इच्छुकांसाठी आमची दारं उघडी: प्रफुल पटेल यांचा सुचक इशारा

197
Praful Patel: ४ जूननंतर इच्छुकांसाठी आमची दारं उघडी: प्रफुल पटेल यांचा सुचक इशारा
Praful Patel: ४ जूननंतर इच्छुकांसाठी आमची दारं उघडी: प्रफुल पटेल यांचा सुचक इशारा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस ते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. भाजपने आमच्याशी चर्चा करून ठरवलं होतं की एक महिना राष्ट्रपती शासन लागल्यानंतर आपण एकत्रित येऊ आणि सरकार स्थापन करू. असा गौप्यस्फोट प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी केला आहे. तर एकदा मोदी प्रचंड बहुमताने सत्तेवर पुन्हा आल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर होणारच आहे. त्यावेळी पाहू कोण आमच्या सोबत यायला तयार होतं, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा –Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळणार ?)

प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले, “मोदी प्रचंड बहुमताने देशाच्या सत्तेवर पुन्हा आल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर होणारच आहे. त्यावेळी पाहू कोण आमच्या सोबत यायला तयार होते. राजकारणात दार उघडे ठेवावच लागतात आणि आमचे दार उघडे आहे. तेव्हा (४ जून नंतर लोकसभा निकालानंतर) कोणी येऊ इच्छित असेल तर जरूर विचार करता येईल त्याला सन्मानाने आम्ही घेऊ.” (Praful Patel)

(हेही वाचा –C Voter Survey: मोदी सोडून पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती? सी वोटरचा सर्व्हे आला समोर)

महायुतीतील जागावाटपाच्या तिढ्यावर बोलताना प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले, “महायुतीत आम्ही आल्यानंतर काही जागांचा (नाशिक, सातारा) प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या २४ जिंकलेल्या जागा आहे एकनाथ शिंदे यांच्या १३ जिंकलेल्या जागा आहेत त्या संदर्भात कुठला वाद नाही. आमच्या पारंपरिक चार जागा आहे. त्याबद्दलही कुठलाही वाद नाही. मात्र त्यापेक्षा जास्त ज्या जागा आम्ही घेऊ इच्छितो, तिथे आमचे संघटन आहे. आमची ताकद आहे, आमचे आमदार आहेत. तिथे आम्ही चांगली लढत देऊ शकतो. त्या जागेची आमची मागणी आहे.” असं प्रफुल पटेल म्हणाले आहेत. (Praful Patel)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.