Iran-lsrael Attack : शांतता, सुरक्षेला धोका होईल, असा मार्ग टाळण्याचे भारताचे आवाहन

Iran-lsrael Attack : इराण आणि इस्रायल यांच्यात तणावपूर्ण स्थिती आहे. त्यात इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हल्ला केला.

162
Iran-lsrael Attack : शांतता, सुरक्षेला धोका होईल, असा मार्ग टाळण्याचे भारताचे आवाहन
Iran-lsrael Attack : शांतता, सुरक्षेला धोका होईल, असा मार्ग टाळण्याचे भारताचे आवाहन

इराण आणि इस्रायल (Iran-lsrael Attack) यांच्यातील संभाव्य युद्धजन्य स्थिती लक्षात घेऊन भारताने चिंता व्यक्त केली आहे. तसेच प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेला धोका होईल, असा मार्ग टाळण्याचे आणि राजनैतिक संवादाचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले आहे. (Iran-lsrael Attack)

(हेही वाचा- Nana Patole: निवडणुकीआधी नाना काही ना काही षडयंत्र रचतात; परिणय फुकेंचा हल्लाबोल)

इराण आणि इस्रायल (Iran-lsrael Attack) यांच्यात तणावपूर्ण स्थिती आहे. त्यात इराणने इस्रायलवर ड्रोन (Drones) आणि क्षेपणास्त्राच्या (missiles) माध्यमातून हल्ला केला. त्याला इस्रायलने प्रत्त्युत्तर दिले. मात्र यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Iran-lsrael Attack)

इराणच्या दमास्कसमधील वाणिज्य दूतावासावर इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने उपरोक्त हल्ला केला. या हल्ल्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने प्रतिक्रिया देत, परिस्थिती चिघळेल अशी कृती टाळण्याचे आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन केले. दरम्यान, या देशांमधील भारतीय वकीलातीचे अधिकारी तेथील भारतीय समुदायाच्या संपर्कात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) म्हटले आहे. (Iran-lsrael Attack)

परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) या संघर्षावर जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढल्याने चिंता वाटते आहे. यामुळे या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. दोन्ही देशांनी संयम बाळगावा, हिंसाचार टाळून मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत यावे. पश्चिम आशियातील बदलणाऱ्या परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. (Iran-lsrael Attack)

(हेही वाचा- Devendra Fadnavis: लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला; फडणवीसांची फटकेबाजी)

दरम्यान, इराणच्या सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्रायलशी संबंधित मालवाहू जहाज ताब्यात घेतले आहे. या जहाजात १७ भारतीय क्रू मेंबर आहेत. या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत इराणच्या संपर्कात आहे. (Iran-lsrael Attack)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.