IPL 2024 MS Dhoni : विराट नंतर धोनीनेही पार केला सामन्यांचा ‘हा’ टप्पा

IPL 2024 MS Dhoni : एकाच फ्रँचाईजीसाठी दीर्घ काळ खेळण्याच्या बाबतीत धोनीने केली विराटची बरोबरी. 

181
IPL 2024 MS Dhoni : विराट नंतर धोनीनेही पार केला सामन्यांचा ‘हा’ टप्पा
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल (IPL) हे क्लब क्रिकेट असलं तरी इथंही एखाद्या संघाबरोबर नातं जुळलं की त्यातून एक समीकरण तयार होतं. जसं की, रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग आहे. विराट कोहली सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग राहिला आहे, तसंच चेन्नई सुपर किंग्ज आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हे ही एक समीकरण आहे. मध्ये दोन हंगाम पुणे वॉरियर्स बरोबर खेळल्यानंतर धोनी पुन्हा चेन्नईबरोबर आला आणि त्याबरोबरच एक नवीन विक्रमही त्याच्या नावावर लागला आहे. एकाच फ्रँचाईजीसाठी २५० सामने खेळणारा धोनी विराट कोहलीनंतर या लीगमधील दुसरा खेळाडू ठरला आहे. (IPL 2024 MS Dhoni)

या २५० सामन्यांमध्ये चॅम्पियन्स लीगमध्ये खेळलेले २५ सामनेही धरले आहेत. हा धोनीचा कदाचित शेवटचा आयपीएल (IPL) हंगाम असावा आणि तो सध्या संघाचा कर्णधारही नाही. त्याने लीगच्या सुरुवातीला कप्तानी सोडली आहे आणि त्याच्या ऐवजी ऋतुराज गायकवाड संघाचा कप्तान झाला आहे. एकाच फ्रँचाईजीकडून खेळण्याच्या बाबतीत आता धोनी विराट कोहलीबरोबर जोडला गेला आहे. (IPL 2024 MS Dhoni)

(हेही वाचा – CM Eknath shinde: मविआत उबाठाची अवस्था उठ बस सेना – मुख्यमंत्री)

विराटने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून २४३ आयपीएल आणि १४ चॅम्पियन्स लीग मिळून २५४ सामने खेळल्या आहेत. २००८ च्या आयपीएल लिलावात धोनी (MS Dhoni) चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला. तेव्हापासून तो संघाचा कर्णधारही आहे. मध्ये २०१६ आणि २०१७ चे हंगाम तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स या फ्रँचाईजीकडून खेळला आणि २०१८ मध्ये लिलावात तो पुन्हा एकदा चेन्नईची पहिली पसंती होती. तसंच २०२२ च्या लिलावातही चेन्नई आणि धोनी हे समीकरण तुटलं नाही. चेन्नईला ५ आयपीएल (IPL) विजेतेपदं मिळवून देण्यातही धोनीच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये त्याने चेन्नईला विजेतेपदं मिळवून दिली आहेत. मुंबईबरोबरच चेन्नईनेही सर्वाधिक ५ वेळा ही लीग जिंकली आहे. (IPL 2024 MS Dhoni)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.