Tourist Places In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील ‘ही’ १० पर्यटन स्थळे अवश्य पहा

405
Tourist Places In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील 'ही' १० पर्यटन स्थळे अवश्य पहा
Tourist Places In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील 'ही' १० पर्यटन स्थळे अवश्य पहा

हिमाचल प्रदेशातील (Tourist Places In Himachal Pradesh) भव्य पर्वत आणि दऱ्याखोऱ्यातुन वाहणाऱ्या नद्यांसह, हिमाचल प्रदेश उत्तर भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जे सर्व प्रवाशांच्या यादीत असु शकते. धार्मिक स्थळे, तलाव, विखुरलेल्या सफरचंदाच्या बागा, प्राचीन मठ आणि ऐतिहासिक स्थळे यांनी सुशोभित केलेले, विस्तीर्ण मनोरंजक उपक्रम उपलब्ध करून देताना हिमाचल प्रदेशात (Tourist Places In Himachal Pradesh) बरीच पर्यटनाची आकर्षणे आहेत. हिमाचल प्रदेश पर्यटनामध्ये आपल्याला केवळ एक नैसर्गिक सौंदर्यच पाहायला मिळत नाही, तर समृद्ध संस्कृतीची उधळपट्टी देखील पाहायला मिळते. जसे की, हस्तकला प्रदर्शन,उत्सव, नृत्य, संगीत, खाद्य पदार्थ आणि बरेच काही. हे राज्य स्वतःच एक जग आहे आणि भारताच्या सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटनस्थळांचे (Tourist Places In Himachal Pradesh) सौंदर्य पाहण्याकरिता आणि त्यावर विश्वास ठेवण्यासाठी एकदातरी हिमाचल प्रदेशला भेट द्यावी.

हिमाचल प्रदेशातील १० लोकप्रिय पर्यटन स्थळे Tourist Places In Himachal Pradesh

१. शिमला- हिमाचल प्रदेशातील (Tourist Places In Himachal Pradesh) नयनरम्य प्रदेशात २२० फूट उंचीवर वसलेले शिमला (Shimla). हिमाचल प्रदेशातील लोकप्रिय पर्यटन स्थळ शिमला आहे. हिमालयातील भव्य पर्वतांत ओक आणि पाइनच्या भव्य जंगलांमध्ये संरक्षित असलेले, हे सर्व क्षेत्रातील पर्यटकांच्या रडारवर कायम राहिले आहे. एकदा शिमल्याला भेट दिल्यानंतर शिमला आपल्याला नक्कीच अविस्मरणीय आठवणी देतो. (Tourist Places In Himachal Pradesh)

२. कुल्लू मनाली – कुल्लू मनालीची सहल म्हणजे थकलेल्या मनाला आणि आत्म्याला ताजेतवान करण्यासाठीचे जणू औषधच आहे. कुल्लूला “देवतांचा देश” म्हणतात आणि ते अगदी योग्यच आहे. बियास नदीच्या काठावर आरामात पसरलेल्या जंगलामुळे, दऱ्या, नाले, नद्या आणि फळबागा यांनी वैशिष्ट्यीपुर्ण निसर्गरम्य देखावा निर्माण केलेला आहे. बियास खोऱ्यात मनाली हे शहर वसलेले आहे. (Tourist Places In Himachal Pradesh)

३. धर्मशाळा – भगवान शंकराला समर्पित, प्राचीन भागसुनाग किंवा भागसुनाथ मंदिर हे धर्मशाळेतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मॅक्लॉडगंजपासून ३ किमी अंतरावर आहे आणि येथे हिंदू आणि स्थानिक गोरखा समुदाय वारंवार येतात. मुख्य मंदिराव्यतिरिक्त मंदिरात एक पवित्र तलाव आणि एक जलतरण तलाव आहे. (Tourist Places In Himachal Pradesh)

४. डलहौसी- डलहौसी हे हिमाचल प्रदेशातील एक छोटेसे शहर आहे, जे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नंदनवन मानले जाते. डलहौसी त्याच्या सभोवतालची नैसर्गिक दृश्ये, फुले, कुरण, वेगाने वाहणाऱ्या नद्या, भव्य धुक्याचे पर्वत यांनी वेढलेले आहे. डलहौसी हे हनिमूनसाठी हिमाचलमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते. (Tourist Places In Himachal Pradesh)

५.मॅक्लॉडगंज- मॅक्लॉडगंज हे प्रसिद्ध तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचे घर म्हणून लोकप्रिय आहे. हे हिल स्टेशन जगभरात प्रसिद्ध तिबेटी अध्यात्मिक नेते दलाई लामा यांच्या निवासस्थानासाठी प्रसिद्ध आहे. चहुबाजूंनी टेकड्यांमध्ये वसलेले, मॅक्लॉडगंज प्राचीन तिबेटी आणि ब्रिटिश संस्कृतीने वेढलेले आहे. (Tourist Places In Himachal Pradesh)

६. स्पिती व्हॅली- हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅली चारही बाजूंनी हिमालयाने वेढलेली आहे. बर्फाच्या चादरीत लपेटलेले पर्वत, वळणदार रस्ते आणि येथील सुंदर दऱ्या पर्यटकांना खूप आकर्षित करतात. हिमाचल प्रदेशातील हे एक ठिकाण आहे, जे अत्यंत थंड मानले जाते. (Tourist Places In Himachal Pradesh)

७. चंबा- हिमाचल प्रदेशातील चंबा हे तेथील रमणीय मंदिरे आणि हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. रावी नदीच्या काठावर 996 मीटर उंचीवर वसलेले, चंबा ही डोंगरी राजांची प्राचीन राजधानी होती. ९२० मध्ये राजा साहिल वर्मनने चंबाची स्थापना केली. (Tourist Places In Himachal Pradesh)

८. कसौली- कसौली हे सनसेट पॉइंट, क्राइस्ट चर्च आणि मॉल रोडसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही मॉल रोड आणि मंकी पॉइंटला देखील भेट देऊ शकता. या हिल स्टेशनमध्ये प्रतिष्ठित हनुमान मंदिर देखील आहे, जे भेट देण्यासारखे आहे. (Tourist Places In Himachal Pradesh)

९. खज्जियार – हिमाचल प्रदेशातील डलहौसीपासून २६ कि.मी. अंतरावर खज्जियार हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. स्वित्झर्लंडशी उष्णकटिबंधीय साम्य असणार्‍या जगातील १६० ठिकाणांपैकी एक, खज्जियार हे ६५०० फूट उंचीवर वसलेले आहे. जे पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य आणि सुखद हवामान वन, तलाव आणि कुरणांचे एक अद्वितीय संयोजन प्रदान करते. खज्जियारला हिमाचल प्रदेशचा गुलमार्ग देखील म्हटले जाते आणि ते चंबा, डलहौसी आणि कलाटॉप वन्यजीव अभयारण्य यामधील ट्रेकसाठी सुरूवातीचा बिंदू आहे. (Tourist Places In Himachal Pradesh)

१०. हिडिंबा देवी मंदिर मनाली – मनालीच्या बर्फाच्छादित टेकड्यांच्या मध्यभागी वसलेले हिडिंबा देवी मंदिर, ज्याला धुंगरी मंदिर देखील म्हटले जाते, हे हिंदूंचे प्राचीन श्रद्धा स्थान असून मनाली मधील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक (One of the popular tourist places )आहे. हे मंदिर हिंदू राक्षसी-देवी हिडिंबा देवीला समर्पित आहे. हिडिंबा हि महाभारतातील पांडव भीमाची पत्नी होती. हिडिंबा आणि भीम यांचा पुत्र घटोत्कच याचे हि मंदिर याच परिसरात आहे. (Tourist Places In Himachal Pradesh)

हिमाचल प्रदेश हे असे एक गंतव्यस्थान अर्थात डेस्टिनेशन आहे कि जे पाहता क्षणीच तुमचे हृदय, मन आणि तन जिंकेल. तुमचा मागील जीवनातील सगळं थकवा दूर पळवून लावेल. तुम्हाला हे ठिकाण एवढे आवडेल कि येथून काढता पाय घेणे तुम्हाला नकोसे वाटेल. (Tourist Places In Himachal Pradesh)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.