महायुतीने अद्याप काही जागांवर आपले उमेदवार जाहीर न करता उमेदवारांना थेट उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यात सातारा मतदार संघाचे इच्छुक उमेदवार उदयनराजे भोसले तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघासाठी इच्छुक असलेले उमेदवार नारायण राणे अशा काही बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे समजते. (BJP)
बंडखोरी टाळण्यासाठी सावधगिरीचा उपाय
भोसले आणि राणे यांनी यांची उमेदवारी भाजपाकडून (BJP) अद्याप घोषित करण्यात आली नाही. मात्र मतदार संघात त्यांचा प्रचार सुरू झाला असून बंडखोरी टाळण्यासाठी हा सावधगिरीचा उपाय असल्याचे सांगण्यात येते. (BJP)
दावेदाराने हट्ट सोडला
नारायण राणे हे चार उमेदवारी अर्ज घेऊन गेले असल्याची चर्चा असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले शिवसेनेचे (शिंदे) किरण सामंत यांनीही चार उमेदवारी अर्ज नेल्याचे सांगण्यात येते. किरण सामंत हे राज्यातील महायुती सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू असून मतदार संघावर त्यांनीही आपला दावा केला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. तर किरण यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी उमेदवारीचा हट्ट सोडल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. (BJP)
(हेही वाचा – Ashwini Mate : उबाठा गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांचा भाजपामध्ये प्रवेश)
उदयनराजे १८ एप्रिल, राणे १९ एप्रिलला अर्ज भरणार
भाजपाने उदयनराजे यांना सातारा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याबाबत हिरवा कंदील दिला असून तेदेखील निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेऊन गेले आहेत. उदयनराजे १८ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार असून राणे १९ एप्रिलला आपला अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. (BJP)
७ मे ला मतदान
सातारा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे ला मतदान होणार आहे. यासाठी १२ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १९ एप्रिल हा उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस होऊन गेला तरी अद्याप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community