Places to Visit in Lucknow : लखनौ शहरात पाहण्यासारखी कोणकोणती ठिकाणे आहेत?

आता लखनौमध्ये (Lucknow) आल्यावर कोणकोणती ठिकाणे पाहावीत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण चिंता करु नका. आम्ही तुम्हाला आमच्या लेखाद्वारे लखनौ शहर फिरवून आणणार आहोत. चला तर लखनौची (Lucknow) सैर करुया... (Places to Visit in Lucknow)

204
Places to Visit in Lucknow : लखनौ शहरात पाहण्यासारखी कोणकोणती ठिकाणे आहेत?

लखनौ (Lucknow) हे कबाब आणि “नवाबांचे शहर” म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर साहित्य, संस्कृती आणि वास्तुकलेसाठी देखील प्रसिद्ध आहे. लखनौ (Lucknow) ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. गोमती नदीच्या काठी वसलेले हे खूप मोठे शहर आहे. प्राचीन काळात लखनौ हा कौशल राज्याचा एक भाग होता. असे म्हणतात, भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाला हे शहर भेट म्हणून दिले होते. म्हणूनच काही लोक यास लखनपूर किंवा लक्ष्मणपूर असेही म्हणतात. (Places to Visit in Lucknow)

लखनौमध्ये (Lucknow) आलात तर तुम्हाला कबाब खायला हवंच. मांसाहार चालत नसेल तर शाकाहारी कबाब खा. पण कबाब खाल्ल्याशिवाय या शहराला रामराम म्हणू नका बरं का… आता लखनौमध्ये आल्यावर कोणकोणती ठिकाणे पाहावीत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण चिंता करु नका. आम्ही तुम्हाला आमच्या लेखाद्वारे लखनौ (Lucknow) शहर फिरवून आणणार आहोत. चला तर लखनौची (Lucknow) सैर करुया… (Places to Visit in Lucknow)

(हेही वाचा – PM Narendra Modi म्हणाले ईडी चांगले काम करते)

नवाब वाजिद अली शाह प्राणिसंग्रहालय :

प्रिन्स ऑफ वेल्सच्या आगमनाच्या स्मरणार्थ या प्राणीसंग्रहालयाची स्थापना १९२१ मध्ये करण्यात आली. येथे तुम्ही विविध प्रजातींचे प्राणी पाहू शकता. (Places to Visit in Lucknow)

इंदिरा गांधी तारांगण :

हे तारांगण पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या वास्तूच्या सभोवताली कारंजे आहेत. इथे दररोज तारामंडल शो दाखवला जातो, ज्यात चांद्रयान मिशनची माहिती दिली जाते. (Places to Visit in Lucknow)

आंबेडकर मेमोरियल पार्क :

आंबेडकर मेमोरियल पार्क हे लखनौचे (Lucknow) एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ या पार्कचे निर्माण करण्यात आले आहे. या पार्कमध्ये लोक हजारोंच्या संख्येने येतात. (Places to Visit in Lucknow)

डिजिटल सायन्स सिटी :

हे विज्ञान संग्रहालय नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियमद्वारे डिझाइन आणि विकसित केले आहे. मुलांना नवनवीन वैज्ञानिक तथ्यांसाठी हे ठिकाण खूप आवडते. (Places to Visit in Lucknow)

दिलकुशा कोठी :

दिलकुशा कोठी हे पूर्वी एक शिकारी विश्रामगृह होते. हा राजवाडा १८०० मध्ये मेजर गोर यांनी बरोक शैलीमध्ये बांधला होता. हा राजवाडा अतिशय सुंदर असून पर्यटकांची इथे गर्दी असते. (Places to Visit in Lucknow)

हुसैनाबाद क्लॉक टॉवर :

हुसेनाबाद क्लॉक टॉवरची निर्मिती १८८१ मध्ये करण्यात आली आणि तेव्हापासून हा भारतातील सर्वात उंच क्लॉक टॉवर आहे. याची उंची ६७ मीटर उंच आहे, १४ फूट लांब पेंडुलम आहे. (Places to Visit in Lucknow)

चंद्रिका देवी मंदिर : 

चंद्रिका देवी मंदिर हे लखनौचे (Lucknow) एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे जे आशियाना लखनौ येथे आहे. चंद्रिका देवी मंदिर हिंदू देवी चंडीला समर्पित आहे जी काली, लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप आहे. या मंदिराच्या आवारात एक तलाव देखील आहे जिथे शिवाची मूर्ती स्थापित आहे. या मंदिरात दररोज भाविकांची मोठी वर्दळ असते. (Places to Visit in Lucknow)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.