North East Mumbai : ईशान्य मुंबईत वाढणार उपद्रव?, कोटक आणि सोमय्या कसे पुरुन उरणार!

उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उबाठा पक्षाचे माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (North East Mumbai)

298
North East Mumbai : ईशान्य मुंबईत वाढणार उपद्रव?, कोटक आणि सोमय्या कसे पुरुन उरणार!

उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रथाचे स्टिकर फाडण्याचा प्रकार केल्यामुळे या मतदार संघामध्ये भविष्यातील हाणामारीची भीती वर्तवली जात आहे. या मतदार संघात कोटेचा विरुद्ध माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या लढत आहे. त्यामुळे या मतदार संघातील उपद्रव मुल्यावर येथील निवडणूक आधारित असल्याचे बोलले जात आहे. (North East Mumbai)

उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाचे (BJP) आमदार मिहिर कोटेचा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उबाठा पक्षाचे माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मिहिर कोटेचा आणि संजय पाटील यांच्यात आता सरळ लढत असून पाटील हे सन २००९मध्ये सर्वप्रथम खासदार निवडून आले होते. या निवडणुकीत पाटील यांचा विजय अवघ्या ३ हजार मतांनी झाला होता. त्यानंतर सन २०१४मध्ये तीन लाख १५ हजार आणि सन २०१९मध्येही सुमारे सव्वा दोन लाखांनी पराभव झाला होता. (North East Mumbai)

(हेही वाचा – North Mumbai : घोसाळकर यांचा काँग्रेस प्रवेश? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मान आहे?)

भाजपावरील नाराजी यामाध्यमातून बाहेर

परंतु आता सलग दोन वेळा पराभव पत्करणाऱ्या संजय पाटील हे पराभवाची हॅट्रीक करतात भाजपा (BJP) उमेदवाराला विजयाची हॅट्रीक करण्यास रोखतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे उमेदवार म्हणून निवडणुकीत आजवर उतरणारे संजय पाटील हे आता शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरत आहेत. त्यामुळे शिवसेनेची मते आता त्यांच्या पारड्यात पडली जाण्याची शक्यता असल्याने त्यांचेही पारडे काही चांगले असल्याचे बोलले जात आहे. (North East Mumbai)

त्यातच रविवारी मानखुर्द परिसरात कोटेचा यांच्या प्रचार रथावरील स्टिकर फाडले गेले. या मतदार संघांमध्ये भाजपाचे प्राबल्य कमी असून बऱ्याचप्रमाणात भाजपावरील (BJP) नाराजी यामाध्यमातून बाहेर आली की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. मात्र मानखुर्द गोवंडी विधानसभा मतदार संघ सोडल्यास उर्वरीत सर्व मतदार संघात भाजपासाठी पुरक वातावरण आहे. त्यामुळे भाजपाविरोधी वातावरणातून ही घटना घडली असावी असे बोलले जात आहे. (North East Mumbai)

(हेही वाचा – काँग्रेस नेते Kamal Nath यांच्या घरी पोलिसांचे पथक दाखल; कारण…)

कोटेचा यांचे मताधिक्य कमी झाल्यास यांना फटका 

मात्र, कोटेचा हे नवीन उमेदवार असले तरी यापूर्वीचे खासदार राहिलेले मनोज कोटक आणि किरीट सोमय्या यांच्यावर ही जागा निवडून आणण्याची प्रमुख जबाबदारी असून कोटेचा यांचा पराभव झाल्यास याची जबाबदारी कोटक आणि सोमय्यांवरच अधिक असेल असे बोलले जात आहे. त्यामुळे कोटेचा यांचे मताधिक्य कमी झाल्यासही याचा फटका कोटक आणि सोमय्या यांच्या राजकीय कारकिर्दीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (North East Mumbai)

कोटेचा यांच्याशी लढत देणारे संजय पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्या गटाकडून तीव्र वरोध असून संजय पाटील हे आता शिवसेनेत असल्याने आपली उपद्रव मुल्यता अधिक दाखवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे संजय पाटील यांची उपद्रव मुल्य रोखण्यासाठी कोटक आणि सोमय्या हे याचा कसा प्रयत्न करतात तसेच पाटील यांना पुरुन उरतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (North East Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.