Monsoon Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस ?; जाणून घ्या ‘एल निनो’ आणि’ला निना’चा परिणाम…

भारतीय हवामान खात्याचा अंदाज, १०६ टक्के पाऊस बरसणार

279
Monsoon Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस ?; जाणून घ्या 'एल निनो' आणि'ला निना'चा परिणाम...

गरमीच्या दिवसांत राज्यात सूर्य आग ओकत असताना भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सर्व नागरिकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. यावर्षी सरासरी १०६ टक्क्यांपेक्षा अधिक ५ टक्के पाऊस अपेक्षित आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नकारात्मक शक्यतेच्या अंकानुसार ही शक्यता (१०६-५) म्हणजे तरीदेखील १०१ टक्के येते. तरीही सरासरी पाऊस पडेलच. देशात जून – सप्टेंबर ४ महिन्यांच्या कालावधीत सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचीच शक्यता अधिक जाणवत असल्याचा अंदाज ज्येष्ठ निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे (Ex Meteorologist Manikrao Khule)यांनी व्यक्त केला आहे. (Monsoon Update)

(हेही वाचा – Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरण – दोन्ही हल्लेखोरांना गुजरातमधून अटक )

‘एल निनो’ आणि ‘ला निना’मुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज

तसेच, ‘एल निनो’ (El Nino) आणि ‘ला निना’ (La Nina) मुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन हवामान विभागानं हे दीर्घकालीन अंदाज जाहीर केले आहेत. ‘एल निनो’ जाऊन ‘ला निना’ येत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचं ते म्हणाले. हवामान विभागाकडे असलेल्या जवळपास ७० वर्षांच्या आकडेवारीचा सविस्तरपणे अभ्यास करून या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचेही डॉ. मृत्युंजय महापात्र (Dr. Mrityunjay Mohapatra) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. (Monsoon Update)

(हेही वाचा – Tourist Places In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील ‘ही’ १० पर्यटन स्थळे अवश्य पहा )

महाराष्ट्राला पावसाचा फायदा होणार ?
महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. टरसाइल श्रेणी प्रकारानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्केपेक्षा अधिक पावसाचीच शक्यता असून, ही शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के जाणवत आहे. मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेमुळे अधिक पावसाचे वितरण कसे होते? यावरच पडणारा पाऊस लाभदायी की नुकसान देणारा याचे उत्तर येणारा काळच देईल. (Monsoon Update)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.