राज्यासह सर्वच भागात राजकीय निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार गैरमार्गाने युक्त्या लढवत असतात. अशातच निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी रोकड, मद्य आणि अमली पदार्थाच्या अवैध वाहतुकीवर निवडणूक आयोगाची करडी नजर असते. लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha election 2024) पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. पारदर्शक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. नेत्यांच्या गरळ ओकणाऱ्या आणि आक्षेपार्ह भाषणांवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय अवैध पैशांच्या व्यवहारांवरही कारवाई करण्यात येत आहे. या वेळी निवडणुकीत काळ्या पैशांचा पाऊस पडत असल्याचे दिसते. या वेळी आयोगाने विक्रमी रोख रक्कम वसूल केल्याची माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी दिली. (Lok Sabha election 2024)
(हेही वाचा – Loksabha Election 2024 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले)
७५ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत जप्त करण्यात आलेली ही सर्वाधिक रक्कम
निवडणूक आयोगाने (Election Commision) आतापर्यंत एकूण ४,६५० कोटी रुपये जप्त केले आहेत. देशातील लोकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत जप्त करण्यात आलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जप्त केलेली रक्कम २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा कितीतरी जास्त आहे. मात्र, निवडणूक प्रक्रिया सुमारे दीड महिना चालणार असल्याने हे प्रमाण बरेच जास्त असू शकते. (Lok Sabha election 2024 )
सरकारी मंडळी २४ तास सतत कार्यरत
निवडणूक आयोगाने असेही म्हटले आहे की, अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ०१ मार्चपासून दररोज १०० कोटींहून अधिक रक्कम जप्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ‘२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसह, निवडणूक आयोगाने देशातील लोकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वाधिक जप्तीची नोंद केली आहे. आयोगाने सांगितले की, या वसुलीमध्ये उड्डाण पथके, सांख्यिकी निरीक्षण पथके, व्हिडिओ पाहणारी पथके आणि सीमा चौक्या २४ तास सतत कार्यरत आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रोख रक्कम, दारू, मोफत वस्तू, ड्रग्ज आणि मादक पदार्थांची कोणतीही हालचाल किंवा वितरण होणार नाही, याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोग सतत काम करत आहे. (Lok Sabha election 2024 )
कारवाईचा धडाका
मुद्देमाल किंमत
अमली पदार्थ २,०६९ कोटी
मद्य ४८९ कोटी
रोकड ३९५ कोटी
अन्य वस्तू १,६९७ कोटी
एकूण ४,६५० कोटी
जाणून घ्या मतदानाच्या तारखा
उल्लेखनीय आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. (Lok Sabha election 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community