Israel Iran Attack : जगाला युद्ध परवडणारे नाही; जागतिक नेते इस्रायलला करणार ‘हे’ आवाहन

246
Israel Iran Attack : जगाला युद्ध परवडणारे नाही; जागतिक नेते इस्रायलला करणार 'हे' आवाहन
Israel Iran Attack : जगाला युद्ध परवडणारे नाही; जागतिक नेते इस्रायलला करणार 'हे' आवाहन

क्षेपणास्त्रे डागली. ही क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात इस्रायल यशस्वी झाला असला, तरी इस्रालयने प्रतिहल्ला केल्यास पुन्हा जगात पुन्हा नव्या युद्धाचे सावट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील नेत्यांनी इस्रायलने इराणला प्रत्युत्तर देऊ नये, असे आवाहन केले आहे. (Israel Iran Attack)

(हेही वाचा – Ram Mandir Ayoddhya : रामनवमीनिमित्त अयोध्येत उत्साह; रामलल्लाचे दर्शन २० तास चालू रहाणार)

संयक्त राष्ट्रांचे (United Nations) प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी म्हटले आहे की, जगाला आणखी एक युद्ध परवडणारे नाही. ब्रिटनचे (Britain) परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरॉन यांनी ब्रिटन प्रत्युत्तराच्या हल्ल्याला समर्थन देत नाही, असे सांगितले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला प्रयुत्तर न देण्यासंबंधी आवाहन करणार असल्याचे सांगितले. इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष झाला, तर तेलाच्या किमती वाढण्याचा मोठा धोकाही अनेक नेत्यांनी व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅलेक्झांडर शॅलेन बर्ग (Alexander Shallen Berg) यांनी इराणने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाला लगाम घालण्याचे आवाहन त्यांनी इराणला केले. जर्मनचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅनालेना बेअरबॉक यांनी जर्मनीतील इराणच्या राजदूताला बर्लिनमधील परराष्ट्र मंत्रालयात बोलवले आणि इराणने इस्रायलवर हल्ला करू नये, असे सांगण्यात आले. अमेरिकेनेही इराणबरोबरच्या व्यापक युद्धात समर्थन देत नसल्याचे इस्रायलला सांगितले.

तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी इराणला रोखले पाहिजे – इस्रायल

इराणच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची महत्त्वाची बैठक झाली. जागतिक शांततेसाठी आणि तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी इराणला रोखणे अत्यंत आवश्यक असल्याचे इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इराणचे राजदूत आमीर इरवानी यांनी आम्ही जे काही केले ते आमच्या सुरक्षेसाठी केल्याचे सांगितले. यूएनच्या कलम 51 नुसार आम्हाला तसे करण्याचा अधिकार आहे. (Israel Iran Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.