१८ एप्रिल १९८२ रोजी ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ मोन्युमेंट्स अँड साईट्स’ द्वारे जागतिक वारसा दिन (World Heritage Day) साजरा केला गेला. याआधी हा दिवस जागतिक स्मारके आणि पुरातत्व स्थळ दिन म्हणून साजरा केला जात होता. सर्व जुन्या वारशांची देखभाल करण्यासाठी “युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर” ची स्थापना करण्यात आली. सर्वात आधी १८ एप्रिल १९७८ रोजी जगातील एकूण १२ स्थळांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. (World Heritage Day)
पुढे १८ एप्रिल १९८३ रोजी प्रथमच भारतातील चार ऐतिहासिक स्थळांचा UNESCO ने “जागतिक वारसा स्थळ” म्हणून समावेश केला. ताजमहाल, आग्र्याचा किल्ला, अजिंठा आणि एलोरा लेणी यांचा समावेश केल्यामुळे भारताची मान उंचावली. प्रत्येक वारसा स्थळ ही ज्या देशामध्ये आहे त्या देशाची मालमत्ता असते; परंतु भविष्यातील पिढ्यांसाठी आणि मानवतेच्या फायद्यासाठी त्यांचे संवर्धन करणे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हिताचे आहे. म्हणूनच त्यांचे जतन करण्याची जबाबदारी संपूर्ण जागतिक समुदायाची आहे. (World Heritage Day)
(हेही वाचा – Toyota किर्लोस्कर मोटरने नवीन इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल जीएक्स (ओ) ग्रेड केले लॉन्च)
जागतिक वारसा स्थळांमध्ये ‘या’ स्थळांचाही समावेश
भारतामध्ये एकूण ३६९१ स्मारके आणि स्थळे आहेत. यापैकी ४० स्थळे UNESCO ने जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केली आहेत. जागतिक वारसा स्थळांमध्ये आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासारख्या नैसर्गिक स्थळांचाही समावेश आहे. २००४ मध्ये सांस्कृतिक वारशासाठी ६ आणि नैसर्गिक वारशासाठी ४ निकष होते. २००५ मध्ये, हे एकूण १० बनवण्यात आले. कोणत्याही महत्वाच्या ठिकाणाला किमान एक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे जागतिक वारसा स्थळांमध्ये त्या ठिकाणांचा समावेश केला जातो. (World Heritage Day)
युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) ने आतापर्यंत १६७ देशांमधील एकूण ११५५ स्मारके UNESCO जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केली आहेत. महाराष्ट्रात अनेक गड-किल्ले आहेत. या किल्ल्यांचा इतिहासही दैदिप्यमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातून देशाचे नेतृत्व केले. गड-किल्ले हा आपला वारसा आहे. त्यांचे जतन आपण केले पाहिजे आणि या किल्ल्यांना देखील जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट केले पाहिजे. (World Heritage Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community