NIVAAR Cyclon : ‘निवार’ चक्रीवादळामुळे झाले भीषण नुकसान

162
NIVAAR Cyclon : ‘निवार’ चक्रीवादळामुळे झाले भीषण नुकसान
NIVAAR Cyclon : ‘निवार’ चक्रीवादळामुळे झाले भीषण नुकसान

दक्षिण भारतालगतच्या समुद्रात वादळामागून वादळांची साखळी सुरू आहे. अग्नेय अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडील सोमालिया देशाकडे सरकताना त्याचे ‘गती’ चक्रीवादळात रूपांतरण झाले. हे वादळ सोमालियाच्या रास बिन्नाहजवळ निवळून गेले. ‘गती’ तीव्र चक्रीवादळ निवळतेय तोच बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत 24, नोव्हेंबर २०२० ला ‘निवार’ चक्रीवादळ तयार झाले. ()

(हेही वाचा – AC Sarkar : ब्रह्मगिरीवर उभारला समांतर सरकारचा स्तंभ; नक्षलवाद्यांशी संबंध ?)

या वादळामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले.

  • चक्रीवादळ जमिनीवर प्रवेश करत असताना पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
  • चेन्नईमध्ये सखल भागांतील अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
  • कुड्डलूर जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्रातील भाताची शेती पाण्याखाली गेली. किनारपट्टीवरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
  • ताशी १२० ते १३० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तमिळनाडूमध्ये झाडे पडल्याच्या ४०० घटनांची नोंद
  • १०१ घरांची पडझड
  • मुसळधार पावसामुळे 10,000 हून अधिक लोकांनी घेतला 147 मदत छावण्यांमध्ये आश्रय
  • अडीच लाख लोकांना हलवले सुरक्षित ठिकाणी
  • 94,464 हेक्टर भूमीवरील भात, कापूस, भुईमूग, हरभरा आणि इतर पिकांचे नुकसान
  • या वादळामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.