Dhairyasheel Mohite यांच्या ‘नो-बॉल’वर राम सातपुतेंचा ‘सिक्सर’

धैर्यशील यांनी अकलूज येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी पहिल्याच भाषणात त्यांनी सोलापूरचे भाजपाचे (BJP) उमेदवार राम सातपुते यांच्यावर शाब्दिक हल्ला करत टीका केली.

214
Dhairyasheel Mohite यांच्या ‘नो-बॉल’वर राम सातपुतेंचा ‘सिक्सर’

राज्यातील राजकीय कुटुंबातील धैर्यशील मोहिते (Dhairyasheel Mohite) पाटील यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आणि ‘ओपनिंग’लाच त्यांनी भाजपाच्या राम सातपुते यांना ‘नो-बॉल’ टाकला, त्यावर राम सातपुते यांनी ‘फ्री हिट’ लगावत थेट ‘सिक्सर’ मारला. (Dhairyasheel Mohite)

तुझं पार्सल माघारी बीडला पाठवण्याची जबाबदारी आमची

धैर्यशील यांनी अकलूज येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी पहिल्याच भाषणात त्यांनी सोलापूरचे भाजपाचे (BJP) उमेदवार राम सातपुते यांच्यावर शाब्दिक हल्ला करत टीका केली. पण तो फुसका बार निघाला आणि सातपुते यांनी त्यांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले. गेल्या ७० वर्षात जी काम झाली नाहीत ती कामे भाजपाच्या माध्यमातून अडीच वर्षात केल्याचा दावा सातपुते यांनी केला होता. त्यावर धैर्यशील यांनी टीका करत “विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सांगण्यावरून सातपुते यांना एका रात्रीत आमदार’ केल्याचा दावा केला तसेच ‘आता हे तुझं पार्सल माघारी बीडला पाठवण्याची जबाबदारी आमची’ असा टोला मारला. (Dhairyasheel Mohite)

(हेही वाचा – Madanjeet Singh : भारतीय डिप्लोमॅट, फोटोग्राफर आणि लेखक मदनजीत सिंह)

विकासकामांचे पार्सल घेऊन दिल्लीला जाईन

त्यावर सातपुते यांनी उत्तर देताना, “सोलापूरकरांनीच मला दिल्लीला पाठवायचे ठरवले आहे. मी निश्चित दिल्लीला पार्सल घेऊन जाईन, परंतु इथल्या टेक्स्टाईल पार्कच्या कागदपत्रांचे, इथे आयटी कंपन्या आल्या पाहिजे, त्याचे कागदपत्र घेऊन दिल्लीला जाईन. या सोलापूरमधील दुष्काळी गावांना पाणी मिळालं पाहिजे, त्याचे पेपर्स घेऊन मी दिल्लीला जरूर जाईन. माझ्या गोरगरीब जनतेसाठी दिवस-रात्र एक करेन. मी अतिशय विनम्रतेने सांगतो की, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. संघर्षातून इथपर्यंत आलेलो आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही,” असे प्रत्युत्तर दिले आणि धैर्यशील यांची बोलती बंद केली. (Dhairyasheel Mohite)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.