Agriculture Government Jobs : शेतीविषयक सरकारी नोकर्‍या कोणकोणत्या आहेत?

IndGovtJobs ने कृषी आणि फलोत्पादन विभागातील नवीनतम सरकारी नोकऱ्यांची यादी केली आहे. सहायक कार्यकारी अभियंता, हॉर्टिकल्चर इंस्पेक्टर, सहायक निदेशक (हॉर्टिकल्चर), कृषि अधिकारी, परियोजना पद, फील्ड वर्कर अशा पदांची सध्या भरती सुरु आहे. (Agriculture Government Jobs)

217
Agriculture Government Jobs : शेतीविषयक सरकारी नोकर्‍या कोणकोणत्या आहेत?

कृषी (Agriculture) हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे, कारण भारतीय लोकसंख्येपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोक शेती आणि संबंधित क्षेत्रात कार्यरत आहेत. राज्य/केंद्रीय संस्था आणि विभागांमध्ये विविध कृषी नोकऱ्या उपलब्ध आहेत. कृषी मंत्रालय, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) संस्थेच्या अंतर्गत १०१ ICAR संस्था आणि ७१ कृषी विद्यापीठे कृषी क्षेत्रात सरकारी भरतीच्या भरपूर संधी उपलब्ध करून देत आहेत. (Agriculture Government Jobs)

IndGovtJobs ने कृषी आणि फलोत्पादन विभागातील नवीनतम सरकारी नोकऱ्यांची यादी केली आहे. सहायक कार्यकारी अभियंता, हॉर्टिकल्चर इंस्पेक्टर, सहायक निदेशक (हॉर्टिकल्चर), कृषि अधिकारी, परियोजना पद, फील्ड वर्कर अशा पदांची सध्या भरती सुरु आहे. याचबरोबर कृषी क्षेत्रात (Agricultural Sector) सरकारी नोकरीच्या बाबतीत अनेक पदे असतात. तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला नोकरी मिळते आणि पुढेपुढे पदोन्नती होत जाते. (Agriculture Government Jobs)

(हेही वाचा – CRIME: नवरदेवाने लग्नाच्याच दिवशी विहिरीत उडी मारून केली आत्महत्या, लग्नमंडपात शोककळा)

कृषी सरकारी नोकरीसाठी पात्रता :
  • फलोत्पादन, कृषी किंवा संबंधित विषयात बी.एस्सी. पदवी किंवा पदविका.
  • कृषी अभियांत्रिकी किंवा संबंधित अभियांत्रिकी शाखांमध्ये बी.ई./बी.टेक अभियांत्रिकी पदवीधर.
  • कृषी किंवा फलोत्पादन किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर किंवा पीएच.डी.
कृषी क्षेत्रात करिअरच्या संधी :
  • कृषी शास्त्रज्ञ भर्ती मंडळ (ASRB) – कृषी संशोधन सेवा
  • कृषी क्षेत्र अधिकारी
  • कृषी अधिकारी
  • शास्त्रज्ञ
  • वनस्पतिशास्त्रज्ञ
  • फार्म मॅनेजर
  • ऍग्रोमेट निरीक्षक
  • विषयाचे विशेषज्ञ
  • कृषी संकाय पदे, आणि अधिक

अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही https://icar.gov.in/vacancies या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नोकरीच्या संधी शोधू शकता. तसेच महाराष्ट्रात सरकारी नोकरी शोधत असाल तर https://krishi.maharashtra.gov.in/1226/Recruitment या वेबसाईटला भेट देऊ शकता. (Agriculture Government Jobs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.