लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते रणदीप सिंह यांनी भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याविषयी अश्लील टिपण्णी केली होती. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आयोगाने सुरजेवाला यांच्यावर मोठी कारवाई केली असून त्यांना पुढील ४८ तासांसाठी प्रचार करण्यास बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरजेवाला पुढील ४८ तास काँग्रेस पक्षासाठी कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करू शकणार नाहीत.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, सुरजेवाला मंगळवारी संध्याकाळी 6 ते गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुढील 48 तास काँग्रेस पक्षाचा प्रचार करू शकणार नाहीत. एवढेच नाही तर नियमांनुसार त्यांना या बंदीच्या काळात मीडियाशी बोलताही येत नाही. वास्तविक, रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मथुरेच्या विद्यमान खासदार आणि भाजपच्या तिकीटावर पुन्हा एकदा या जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर बंदी आदेश जारी केला आहे.
(हेही वाचा Naxalite : मतदानाच्या तीन दिवस आधी नक्षलवादी आणि पोलिस यांच्यात चकमक; नक्षल्यांचा कमांडर ठार)
काँग्रेस नेत्यांनी काय दिले स्पष्टीकरण?
यानंतर रणदीप सुरजेवाला यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. त्यांचा (Hema Malini) अपमान करण्याचा किंवा दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, असे ते म्हणाले. त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता निवडणूक आयोगाने त्यांच्या युक्तिवादाकडे लक्ष दिले नसून त्यांच्याविरोधात ४८ तास प्रचार न करण्याचे आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community