Nashik Ram Navami: रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल, प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या…

224
Nashik Ram Navami: रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल, प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या...
Nashik Ram Navami: रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल, प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या...

शहरातील पंचवटी व नाशिकरोड परिसरात रामनवमी साजरी केली जाते. यानिमित्ताने मिरवणूक काढली जात असल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. पोलीस बंदोबस्ताच्या नियोजनासह वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

नाशिक रोड येथे बुधवारी (१७ एप्रिल) रामनवमीनिमित्त मुक्तिधाम मंदिरापासून दुपारी ३ वाजता मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. मुक्तीधाम मंदिर, बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन, सुभाष रोड, सत्कार पॉईंटकडून देवळाली गावमार्गे मुक्तिधाम मंदिर, असा या मिरवणुकीचा मार्ग आहे. या मिरवणुकीमध्ये २० ते २५ हजार भाविक सहभागी होत असल्याने या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यात परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्यासह नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर व इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह २५० पोलीस, राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, मिरवणुकीमुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हे बदल बुधवारी (१७ एप्रिल) दुपारी ३ ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत लागू राहतील. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. (Nashik Ram Navami )

प्रवेश बंद मार्ग

– सत्कार पॉईंट ते बिटको सिग्नल मार्गावरील वाहतूक बंद

– रेल्वे स्टेशनकडून सत्कार पॉईंटकडे जाणारा मार्ग वाहतूकीस बंद

– दत्त मंदिर सिग्नल – बिटको चौक मार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहतूक बंद

– डॉ. आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशनकडून सत्कार पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मतदानासाठी ओळखपत्राचे ‘हे’ १२ पुरावे ग्राह्य धरणार, जाणून घ्या…)

पर्यायी मार्ग

– उपनगरकडून रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहतूक दत्त मंदिर सिग्नलच्या उजवीकडून सुराणा हॉस्पिटल, आनंदनगरी टी पॉईट – सत्कार पॉईंट – रिपोर्टे कॉर्नर येथून रेल्वे स्टेशनकडे- परत सुभाष रोड मार्गे – दत्त मंदिरा सिग्नल इतरत्र वळवण्यात येणार आहे.

– रेल्वे स्टेशनकडून सीबीएसकडे जाणारी वाहने जुने नाशिकरोड कोर्ट समोरून आर्टिलरी रोड मार्गे जयभवानी चौकातून उजवीकडे वळून उपनगर सिग्नलकडून इतरत्र जातील.

– पुणेकडून नाशिककडे येणारी-जाणारी अवजड वाहने, बसेस दत्त मंदिर सिग्नल येथून वीर सावरकर उड्डाणपुलावरून मार्गस्थ होतील.

– विहितगाव सिग्नलकडून बिटकोकडे जाणारी वाहतूक देवळाली गाव, मालधक्का रोडने रेल्वेस्टेशनकडे जाईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.