लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) 16 मार्च ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 2337 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 2331 (99.63%) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 19018 तक्रारीपैकी 18722 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.
जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे 54 प्रमाणपत्र वितरित
राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 54 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा Indi Alliance : इंडि आघाडीत कुणाकडेही पंतप्रधान होण्याची क्षमता नाही; माजी पंतप्रधानांचे महत्वाचे विधान)
कोणत्या मतदारसंघात किती मतदार?
- रामटेक 20,49,085
- नागपूर 22,23,281
- भंडारा-गोंदिया 18,27,188
- गडचिरोली -चिमुर 16,17,207
- चंद्रपूर 18,37,906
Join Our WhatsApp Community