Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राचा धक्कादायक ओपिनियन पोल; NDA आणि INDI आघाडीला किती मिळणार जागा?

399

देशात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. महाराष्ट्रातही सर्वच पक्षांचा जबरदस्त प्रचार सुरू आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात राज्यात मोठ-मोठ्या राजकीय उलथापालथी बघायला मिळाल्या. यामुळे या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे. यातच, पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आलेल्या एका सर्व्हेमध्ये राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी एनडीएला 28 जागा मिळताना दिसत आहेत. यांपैकी 25 जागा भाजपला, तर तीन जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळण्याची शक्यता आहे.

याच बरोबर, I.N.D.I. आघाडीला 20 जागा मिळताना दिसत असून यापैकी 10 जागा शिवसेनेला (ठाकरे गट) मिळण्याची शक्यता आहे. हा सर्व्हे टीव्ही 9, पीपल्स इनसाइट पोलस्ट्रॅटने केला आहे. महत्वाचे म्हणजे या सर्व्हेमध्ये जवळपास 25 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. उमेदवारांचा विचार करता या सर्व्हेमध्ये नागपूरमधून नितिन गडकरी, बारामतीतून सुप्रिया सुळे तर उत्तर मुंबईतून पियूष गोयल विजयी होताना दिसत आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा Indi Alliance : इंडि आघाडीत कुणाकडेही पंतप्रधान होण्याची क्षमता नाही; माजी पंतप्रधानांचे महत्वाचे विधान)

कुणाला किती जागा? 

भाजप – 25, काँग्रेस – 05, शिवसेना (शिंदे गट) – 03, एनसीपी (अजित गट) – 00, शिवसेना (उद्धव गट) – 10, एनसीपी( शरद पवार गट) – 05, इतर – 00

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.