Heat wave: मुंबईकरांची काहिली; मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट

219
Heat wave: मुंबईकरांची काहिली; मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट
Heat wave: मुंबईकरांची काहिली; मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट

राज्यातील बहुतांश भागांमध्ये (Heat wave) तापमान ३७ अंशांच्याही पलिकडे पोहोचलं असून, (Mumbai) मुंबई, ठाणे (Thane), पालघरमध्येही मंगळवारपासूनच उष्णतेच्या लाटांनी (Heat wave) नागरिकांना हैराण केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन दिलं जात आहे. (Heat wave)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024: पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज; १९ एप्रिलला मतदान ; १० हजार ६५२ मतदान केंद्र)

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये कोकणात उष्णतेच्या लाटेचा (Heat wave) इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबईतही पारा ४० अशांच्या पलिकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानात होणारी ही लक्षणीय वाढ (Heat wave) पाहता नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान विभागासह आरोग्य विभागानेही दिला आहे. (Heat wave)

उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून उत्तर कोकणासाठीचा उष्णतेच्या लाटेचा (Heat wave) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर आज ठाणे, मुंबई, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. (Heat wave)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.