पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रामनवमीनिमित्त (Ram Navami) देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून देशवासियांना शुभकामना संदेश दिला आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की, “देशभरातील माझ्या कुटुंबियांना रामनवमी, भगवान श्री राम जयंतीच्या (Ram Navami)शुभेच्छा.” या शुभ प्रसंगी, माझे हृदय भावना आणि कृतज्ञतेने भरले आहे. या वर्षी मी माझ्या लाखो देशवासीयांसह अयोध्येत प्राणप्रतिष्ठा पाहिली ही श्री रामाची परम कृपा आहे. अवधपुरीतील त्या क्षणाच्या आठवणी आजही माझ्या मनात त्याच ऊर्जेने स्पंदन करतात. मला पूर्ण विश्वास आहे की, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श विकसित भारताच्या उभारणीसाठी मजबूत आधार बनतील. त्यांच्या आशीर्वादाने आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा मिळेल. (Ram Navami)
(हेही वाचा –Eknath Khadse : एकनाथ खडसेंना छोटा शकील गँगकडून धमकी, गुन्हा दाखल)
The first Ram Navami after the Pran Pratishtha in Ayodhya is a generational milestone, weaving together centuries of devotion with a new era of hope and progress. This is a day crores of Indians waited for. Innumerable people devoted their lives to this sacred cause.
May the… pic.twitter.com/2aJMLn1hhI
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2024
आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले की, भारतीय लोकांच्या रोमारोमात भगवान राम विराजमान आहेत. भव्य राम मंदिराच्या पहिल्या रामनवमीचा हा प्रसंग राम मंदिराच्या उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या असंख्य रामभक्तांना आणि संत-महात्मांना स्मरण आणि आदरांजली अर्पण करण्याचा आहे. तसेच ही पहिली रामनवमी (Ram Navami)आहे, जेव्हा आमचे रामलल्ला अयोध्येच्या भव्य आणि दिव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. आज रामनवमीच्या (Ram Navami)या सणात अयोध्येत प्रचंड आनंद आहे. तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्येत अशा प्रकारे रामनवमी साजरी करण्याचे भाग्य लाभले आहे. देशवासीयांच्या इतक्या वर्षांच्या कठोर तपश्चर्येचे, त्यागाचे हे फळ असल्याचे मोदींनी आपल्या संदेशात नमूद केलय.(Ram Navami)
हे पहा –
Join Our WhatsApp Community