इराणने इस्राईलवर केलेल्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्याची (Iran Israel War) अमेरिकेने गंभीर दखल घेतली आहे. या हल्ल्यामुळे अमेरिका इराणवर आता क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रोग्रामवर प्रतिबंध लावण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेने मंगळवारी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांबाबत (Iran Israel War) भाष्य केले.
इराणच्या मिसाइल आणि ड्रोन प्रोग्रामवर आम्ही कठोर निर्बंध लादणार आहोत. याबाबत आम्हाला आमच्या सहाकाऱ्यांकडूनही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे असे म्हणत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलविन यांनी इराणच्या मिसाईल आणि ड्रोन प्रोग्रामवर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. इराणने शनिवारी, १३ एप्रिल रोजी इस्रायलवर ३०० क्षेपणास्त्रे डागली होती. तसेच ड्रोन हल्लेही केले होते. यानंतर अमेरिकेने आता इराणच्या विरोधात मोठे पाऊल उचलले. इस्राईलवर हल्ला (Iran Israel War) केल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प (IRGC) ने हल्ल्याची पुष्टी केली. त्यानंतर अमेरिका या युद्धात उतरण्याच्या तयारीला लागली.
Join Our WhatsApp Community