Shri Shahu Chhatrapati : श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याकडे किती कोटींची संपत्ती?

शाहू महाराजांचे प्रतिस्पर्धी उमदेवार संजय मंडलिक हेही कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल 14 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

328

लोकसभा निवडणुकीत यंदा कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज श्रीमंत शाहू छत्रपती (Shri Shahu Chhatrapati) हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असून नियमानुसार त्यांच्याकडील संपत्ती त्यांनी जाहीर केली. त्यांची एकूण  297 कोटी 38 लाख 08 हजार रुपयांची संपत्ती आहे.

कोल्हापुरातून यंदा मोदी विरुद्ध गादी अशा प्रचारातून महाविकास आघाडीने जोर घेत भाजलाला लक्ष्य केले आहे. शाहू छत्रपतींविरुद्ध (Shri Shahu Chhatrapati) महायुतीकडून संजय मंडलिक (Sanjay Mandlik) निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार यात शंका नाही. शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून 297 कोटी 38 लाख 08 हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे 41 कोटी 06 लाखांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे शाहू महाराजांवर कसलेही कर्ज नाही.

(हेही वाचा Baramati Loksabha Election: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासोबत ‘हे’ शरद पवार उतरले बारामतीच्या रिंगणात!)

122 कोटी रुपयांची शेतजमीन 

शाहू छत्रपतींची (Shri Shahu Chhatrapati) 147 कोटी 64 लाख 49 हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर 149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे 17 कोटी 35 लाख व 23 कोटी 71 लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. शाहूंकडे 1 कोटी 56 लाखांचे सोन्याचे, तर 55 लाखांचे चांदीचे दागिने आहेत. शाहू छत्रपतींच्या (Shri Shahu Chhatrapati) नावावरील वाहनांची किंमत सहा कोटी आहे. 122 कोटी 88 लाख इतक्या किंमतीची शेतजमीन त्यांच्या नावावर आहे. तर, पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी 52 लाख रुपयांची शेतजमीन आहे. शाहू महाराजांचे प्रतिस्पर्धी उमदेवार संजय मंडलिक हेही कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल 14 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.