North Indian Restaurants : मुंबईतील सर्वोत्कृष्ट नॉर्थ इंडियन रेस्टोरेंट्स

दक्षिणेकडील किंवा पूर्वेकडील भागांच्या तुलनेत उत्तर भारतीय पाककृतीचा मध्य आशियात प्रभाव आहे.

148
North Indian Restaurants : मुंबईतील सर्वोत्कृष्ट नॉर्थ इंडियन रेस्टोरेंट्स

अवधी, बिहारी, भोजपुरी, कुमानी, मुघलाई, पंजाबी, राजस्थानी अशा अनेक पाककृती उत्तर भारतीय आहेत. यामध्ये वैविध्यपणा आहे. दक्षिणेकडील किंवा पूर्वेकडील भागांच्या तुलनेत उत्तर भारतीय पाककृतीचा मध्य आशियात प्रभाव आहे. पण तुम्हाला जर मुंबईत राहून उत्तर भारतीय जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर काय कराल? चला तर, आम्ही तुम्हाला मुंबईतील सर्वोत्कृष्ट नॉर्थ इंडियन रेस्टॉरेंट्सची माहिती देत आहोत : (North Indian Restaurants)

१. अंग्रेजी ढाबा

अंग्रेजी ढाबा हे हॉटेल लोअर परळ, दादर, वांद्रे आणि अंधेरीत देखील आहे. हे हॉटेल ढाबा-शैलीत बांधण्यात आले आहे. त्याचबरोबर इथे सतत संगीत वाजत राहते, म्हणून जेवताना एक वेगळाच आनंद मिळतो. (North Indian Restaurants)

२. करी मी अप

हे अंधेरीच्या सर्वोत्तम रेस्टॉरंटपैकी एक आहे. इथे केवळ उत्तर भारतीय नव्हे तर सर्व प्रकारच्या पाककृती मिळतात. हे ठिकाण जलद सेवेसाठी ओळखले जाते. इथले जेवण नेहमीच ताजे आणि गरमागरम असते. चिकन खायचं असेल तर इथे आलंच पाहिजे. बटर नान एकदम कुरकुरीत आणि ताजे आहे. स्वच्छताही चांगली असते. कुटुंबासोबत उत्तर भारतीय जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की या. (North Indian Restaurants)

३. दिल्ली हायवे

अंधेरी पूर्व येथे स्थित हे एक स्टायलिश रेस्टॉरंट आहे. इथला डायनिंग सेटअप लाजवाब आहे. एकत्र कुटुंब असेल तरी इथे मोठमोठे टेबल्स आहेत. त्यामुळे तुम्हाला कसलीच अडचण येत नाही. आणि इथलं जेवण तर आहाहा! स्वादिष्ट या शब्दाला पुरेपूर न्याय मिळवून देणारे आहे. (North Indian Restaurants)

४. द बॉम्बे कॅंटिन

हे उत्तर भारतातील उत्तमोत्तम पदार्थ तुम्हाला मिळतील. पण इथल्या पदार्थांची नावे मात्र विचित्र आहेत. अगदी केजरीवाल सुद्धा तुम्ही इथे खाऊ शकता. अहो, गैरसमज करुन घेऊ नका. ’केजरीवाल टोस्ट’ असं एका पदार्थाचं न आव आहे राव! नावे विचित्र असली तरी स्वादामध्ये कमतरता नाही. हे हॉटेल खूपच प्रशस्त आहे. (North Indian Restaurants)

(हेही वाचा – Iran Israel War : इस्राइलवरील हल्ल्यावर अमेरिका इराणच्या विरोधात घेणार कठोर भूमिका)

५. नवाब साहेब

सर्वोत्कृष्ट जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर नवाब साहेबमध्ये येऊन पोटभर जेवलंच पाहिजे. इथले वातावरण खूप चांगले आहे, जागा खूप मोठी आणि प्रशस्त मंद दिवे, पडदे आणि थंडगार हवा, सोबत सुमधूर संगीत. अहो मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला आणखी काय हवे! (North Indian Restaurants)

६. पर्शियन दरबार

इथले जेवण खूप छान आहे, खास करुन मटण कबाब अप्रतिम आहे. ऑर्डर वेळेवर येते. त्यामुळे फार काळ तुमची भूक चाळवली जात नाही. मुघलाई पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था अतिशय सुबकपणे केली आहे, हे एक अतिशय प्रशस्त ठिकाण आहे. (North Indian Restaurants)

७. बलुची

बलुची हे नाव पाकिस्तानमधील बलुचिस्तान या प्रदेशावरून ठेवण्यात आले आहे. उत्तर भारतीय खाद्यपदार्थ ते मुघलाई ते बलुचिस्तानमधील काही प्रसिद्ध पाककृती येथे उपलब्ध आहेत. तुम्हाला वेगळ्या प्रकारचे पदार्थ खायचे असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे. बलुची दाल, बुर्राह बलुची, दुधिया कबाब, तंदूरी आलू, गुच्ची मटर पनीर यासारखे अनेक चवदार पदार्थ तुम्ही इथे चाखू शकता. (North Indian Restaurants)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.