Lok Sabha Election 2024 : मुंबईत उद्धव ठाकरेंना बसणार फटका; महायुतीला किती जागा मिळणार? जाणून घ्या ओपनियन पोल…

एबीपी माझा-सी व्होटरने मतदानापूर्वी सर्वेक्षण करुन मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

314

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) संपूर्ण राज्यात कोणता पक्ष किती जागा जिंकणार, यावर आगामी विधानसभा निवडणुकांची गणिते ठरणार आहेत. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात फुट पडल्यानंतर मतदार शिवसेनेतील शिंदे गट की ठाकरे गटाच्या बाजूने कौल देणार किवा अजित पवार अथवा शरद पवार यांच्या बाजूने जाणार हे निश्चित होणार आहे. एबीपी माझा-सी व्होटरने मतदानापूर्वी सर्वेक्षण करुन मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ओपनियन पोलमध्ये ठाकरे गटाला राज्यात एकूण 9 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यात पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे.

मुंबईतील सहापैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार 

महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाने आग्रहाने मुंबईतील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेतल्या. मुंबईत लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024)  एकूण सहा जागा आहेत. यापैकी चार जागांवर ठाकरे गट तर दोन जागा काँग्रेस पक्षाकडून लढवण्यात येणार आहेत. मात्र, एबीपी माझाच्या ओपिनयन पोलनुसार मुंबईतील सहापैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. यापैकी केवळ दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबईत काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. अन्यथा बाकी जागांवर महायुतीचे उमेदवार सहजपणे विजयी होऊ शकतात, असा निष्कर्ष एबीपीच्या ओपिनियन पोलमधून समोर आला आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार)

ईशान्य मुंबईत तगडी लढत

मुंबईतील उत्तर-मुंबईमध्ये भाजपने पीयूष गोयल यांना रिंगणात उतरले आहे. इथे भाजपचा विजय जवळपास निश्चित आहे. परंतु, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या तीन मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे पारडे जड मानले जात होते. परंतु, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे भाजपच्या मिहीर कोटेचा यांना तगडी लढत देऊ शकतात, असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.