- सुजित महामुलकर
राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले. उमेदवारांची धाकधूकही वाढत चालली आहे. त्यांचे भवितव्य पहिल्यांदा मतदान करणारे आणि ज्येष्ठ म्हणजे ८० पेक्षा जास्त वय असणारे मतदार ठरवणार आहेत, याची कल्पना अनेकांना नसेल. या मतदारांची संख्या एकूण मतदाराच्या तुलनेत ४.५ (साडेचार) टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. (First Time Voter)
१८-१९ आणि ८० + मिळून २० लाखाहून अधिक
राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान विदर्भातील पाच मतदार संघात शुक्रवारी १९ एप्रिलला होणार आहे तर शेवटच्या टप्प्याचे मतदान २० मे ला होणार आहे. राज्य निवडणूक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सुरुवातीच्या तीन टप्प्यातील आकडेवारीनुसार एकूण मतदारांची संख्या जवळपास ४.५४ कोटी इतकी आहे. यात २०.२२ लाखाहून अधिक १८-१९ आणि ८० + मतदार आहेत. म्हणजेच सुमारे ४.५ टक्के, जे उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात निर्णायक भुमिका बजावतील. (First Time Voter)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता मतदानाची उत्सुकता)
६.८८ लाख मतदार पहिल्यांदा हक्क बजावणार
पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी ९५.५४ लाख मतदार असून दुसऱ्या टप्प्यासाठी २.९ कोटी आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १.४९ कोटी मतदार नोंदणी झाली आहे. या तीन टप्प्यासाठी मिळून ६.८८ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करण्यास पात्र आहेत तर ८० पेक्षा अधिक वयाचे मतदार १३.३४ लाख आहेत. ही आकडेवारी जरी तीन टप्प्यातील म्हणजे २४ मतदार संघातील असली तरी अन्य २४ मतदार संघातही सरासरी जवळपास इतकीच संख्या अंदाजित आहे. (First Time Voter)
सर्वाधिक वयोवृद्ध मतदार बारामती
या तीन टप्प्यापैकी १८-१९ वयोगटातील सर्वाधिक मतदार नोंदणी धाराशीव मतदार संघात ३९,६९५ असून सगळ्यात कमी १६,२८९ इतकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात आहे. त्याचप्रमाणे ८० पेक्षा अधिक वयाचे सर्वाधिक मतदार हे बारामती मतदार ७४,४६४ संघात आहेत आणि सगळ्यात कमी वयोवृद्ध ३३,५५९ इतके गडचिरोली-चिमुर मतदार संघात आहेत. (First Time Voter)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community