छत्तीसगड येथील कांकेरमध्ये पोलीस आणि बीएसएफ जवान यांच्यात झालेल्या झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले. यामध्ये नक्षलवाद्यांच्या कमांडरचाही समावेश आहे. राज्य सरकार याला सुरक्षा दलांचे मोठे यश म्हणत आहे. राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई आणि गृहमंत्री विजय शर्मा यांच्यापासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत सर्वांकडून सैनिकांचे कौतुक होत आहे, मात्र काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेते (Supriya Shrinate) यांनी या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांना ‘हुतात्मा’ म्हणून संबोधले आहे. त्यामुळे पुन्हा वादात सापडल्या आहेत. याआधी त्यांनी उत्तराखंड येथील मंडी या लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अभिनेत्री कंगना रानौत यांच्याविषयी अश्लिल टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्या वादात सापडल्या होत्या.
आख़िर Congress अपना DNA दिखा ही देती है,गाली वाली Aunty @SupriyaShrinate अब आपको Naxalite भी शहीद लगने लग पड़े?Ticket कटने से मानसिक संतुलन भी हिल गया है आपका? Shame on you Supriya @MrSinha_ @Starboy2079 @TajinderBagga @MeSavarkar @izeennatrana pic.twitter.com/e6x5jS6KT7
— Monty Rana(Modi’s Family) (@montyyrana) April 17, 2024
सुप्रिया श्रीनेते यांचे काय आहे वादग्रस्त विधान?
सुप्रिया श्रीनेते (Supriya Shrinate) यांचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कांकेर येथील नक्षलवादी चकमक आणि बघेल यांच्या वक्तव्यासंदर्भात सुप्रिया यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भाजप काँग्रेसवर राजकारण करत असल्याचा आरोप करत आहे का, असा सवाल करण्यात आला. यावर सुप्रिया (Supriya Shrinate) म्हणाल्या की, यात कुणी राजकारण करायला नको, मला वाटते सखोल चौकशी व्हायला हवी. आणि जे लोक शहीद झाले त्यात काही सुरक्षा कर्मचारी देखील जखमी झाले त्या सर्वांबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. यात राजकारणाचा प्रश्नच येत नाही.
(हेही वाचा CCTV Camera : सरकारी कॅमेरे असूनही गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना का घ्यावी लागते खाजगी कॅमरांची मदत?)
2019 पासून, सरकार स्थापनेनंतर, सुमारे 3 महिन्यांच्या कालावधीत, किमान 250 छावण्या उभारण्यात आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये 80 नक्षलवादी मारले गेले आहेत, 125 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे आणि 150 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, मला पूर्ण विश्वास आहे की, हे यापुढेही चालू राहील आणि थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण नक्षलवादाचा नायनाट करू, असे सरकारचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community