Paytm Crisis : पेटीएम ग्राहकांना नवीन बँकांच्या युजर आयडीवर हस्तांतरण सुरू 

Paytm Crisis : पेटीएम ग्राहकांचे व्यवहार आता ॲक्सिस, एचडीएपसी अशा त्रयस्थ बँकांच्या माध्यमातून सुरू

190
Paytm Crisis : पेटीएम ग्राहकांना नवीन बँकांच्या युजर आयडीवर हस्तांतरण सुरू 
Paytm Crisis : पेटीएम ग्राहकांना नवीन बँकांच्या युजर आयडीवर हस्तांतरण सुरू 
  • ऋजुता लुकतुके

पेटीएम पेमेंट्स (Paytm Crisis) बँकेवर रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) निर्बंध आणल्यानंतर पेटीएम कंपनीने आता आपल्या युपीआय सेवेसाठी पेमेंट्स सर्व्हिस प्रोव्हायडर बँका बदलायला सुरुवात केली आहे. यापूर्वी पेटीएमचे युपीआय व्यवहार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून होत होते. हे व्यवहार आता येस बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून होतील. ही हस्तांतरणाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने याला परवानगी दिली आहे. (Paytm Crisis)

(हेही वाचा- Narayan Rane : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वेडे झालेत; नारायण राणेंची बोचरी टीका)

‘१४ मार्चला एनपीसीआयने पेटीएमला मध्यस्थ बँका बदलण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, पेटीएमने ४ बँकांशी थर्ड पार्टी पेमेंट्स सर्व्हिस प्रोव्हायडर बँका म्हणून करार केले आहेत. आता सध्याच्या पेटीएम युपीआय ग्राहकांची खाती या मध्यस्थ बँकांच्या मार्फत सुरू ठेवण्यात येतील. त्यामुळे युपीआय ग्राहकांचे आयडी आता बदलतील,’ असं पेटीएम कंपनीने स्टॉक मार्केटला कळवलं आहे. (Paytm Crisis)

पेटीएम ग्राहकांसाठी काय बदलणार?

ग्राहकांची मध्यस्थ बँक बदलल्यावर त्यांचा युझर आयडी बदलणार आहे. यापूर्वी पेटीएम युपीआय वापरणाऱ्यांचा आयडी —@paytm असा होता. आता मध्यस्थ बँकेनुसार हे आयडी @ptaxis, @ptyes, @ptsbi आणि @pthdfc असे होतील. त्यामुळे जेव्हा ग्राहक क्युार कोड ऐवडी युपीआय आयडी देऊन आपले व्यवहार करतात, तेव्हा ग्राहकांना नवीन युपीआय आयडी माहीत करून घेणं गरजेचं असेल. (Paytm Crisis)

(हेही वाचा- IPL 2024, DC vs GT : गुजरातला ८९ धावांत गुंडाळल्यावर दिल्लीचा ६ गडी राखून विजय )

रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर काय कारवाई केली?

रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) १४ मार्च २०२४ ला पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करताना त्यांना नवीन ठेवी स्वीकारण्यावर बंदी धातली. किंवा आहे त्या खात्यात टॉप अप स्वीकारण्यावरही निर्बंध आले. पेटीएम वॉलेट, फास्ट-टॅग अशा सगळ्या खात्यात नवीन पैसे स्वीकारता येणार नाहीत, असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं. पेटीएम कंपनीने (Paytm Company) केवायसी नियमांचं उल्लंघन तसंच व्यवहारांमध्ये काही अनियमितता आढळल्यामुळे मध्यवर्ती बँकेनं (central bank) ही कारवाई केली होती. (Paytm Crisis)

(हेही वाचा- Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : सिंधुदुर्गातून नारायण राणे महायुतीचे उमेदवार, सामंत यांची माघार )

पण, त्यामुळे पेटीएम युपीआय व्यवहारांवरही मर्यादा आली. कारण, कंपनीचे युपीआय व्यवहार हे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून होत होते. या बँकेवरच निर्बंघ आल्यामुळे पेटीएमला हे माध्यम बदलणं आवश्यक होतं. त्यानुसार आता पेटीएम युपीआय व्यवहारांसाठी कंपनीने मध्यस्थ बँका बदलल्या आहेत. (Paytm Crisis)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.