Sakshi Malik : कुस्तीपटू साक्षी मलिकचा टाईम मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तिमत्त्वात समावेश

Sakshi Malik : कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करुन तो लढा साक्षीने अविरत लढला आहे. 

139
Sakshi Malik : कुस्तीपटू साक्षी मलिकचा टाईम मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तिमत्त्वात समावेश
  • ऋजुता लुकतुके

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकचा (Sakshi Malik) समावेश जगप्रसिद्ध टाईम मॅगेझिनने २०२४ च्या प्रभावशाली १०० व्यक्तिमत्त्वात केला आहे. भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर काही खेळाडूंनी त्या विरोधात आवाज उचलला आणि नवी दिल्लीत वर्षभर आंदोलनही केलं आहे. त्या आंदोलनाचा बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक हे खेळाडू मुख्य चेहरा आहेत. (Sakshi Malik)

ब्रिजभूषण यांच्या विरोधात दाद मागण्याबरोबरच त्या प्रकरणाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळेच साक्षीला (Sakshi Malik) टाईम मॅगेझिनने हा मान दिला आहे. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांना अटक व्हावी अशी मागणी सातत्याने केली आहे. या मागणीसाठी या कुस्तीपटूंनी गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून दिल्लीत जंतर मंतर जवळ आंदोलन केलं होतं. भारतात आणि देशाबाहेरही या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा मिळाला. (Sakshi Malik)

(हेही वाचा – CM Eknath Shinde: बारामतीमध्ये भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

शरण यांच्या विरोधात पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हाही दाखल झाला. पण, त्यांना अटक झालेली नाही आणि त्यांनी हे आरोप वारंवार फेटाळले आहेत. त्यानंतर कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकाही झाल्या. आणि यात आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी स्वत:चं पॅनलही उभं केलं. पण, या पॅनलचा पराभव झाला आणि शरण यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांची फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतरही खेळाडूंनी आपंल आंदोलन सुरूच ठेवलं होतं. संजय सिंग यांची निवड झाल्यानंतर साक्षीने (Sakshi Malik) खेळ सोडण्याचा इशाराही दिला होता. साक्षी बरोबरच टाईमच्या यादीत आलिया भट, देव पटेल आणि सत्या नाडेला या भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश आहे. (Sakshi Malik)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.