IPL 2024 Rishabh Pant : रिषभ पंतची दिनेश कार्तिकच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

IPL 2024 Rishabh Pant : दिल्लीसाठी एका डावात सगळ्यात जास्त बळी टिपण्याची कामगिरी रिषभ पंतने केली आहे.

174
IPL 2024 Rishabh Pant : रिषभ पंतची दिनेश कार्तिकच्या 'या' विक्रमाशी बरोबरी
  • ऋजुता लुकतुके

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) संघासाठी यष्टीरक्षक म्हणून एका सामन्यात सर्वाधिक बळी टिपण्याची कामगिरी केली आहे. त्याने दिनेश कार्तिकच्या विक्रमाची बरोबरी केली. बुधवारी गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने ही कामगिरी केली. २ झेल आणि २ यष्टीचीतचे बळी रिषभने मिळवले. यातील यष्टीचीतचे बळी खूपच चपळाई दाखवलेले होते. रिषभने डेव्हिड मिलर आणि रशीद खान हे मोलाचे बळी झेल पकडून मिळवून दिले. तर अभिनव मनोहर आणि शाहरुख खान यांना त्याने यष्टीचीत केलं. (IPL 2024 Rishabh Pant)

(हेही वाचा – ED : ईडीकडून राज कुंद्रा यांची ९७ कोटींची मालमत्ता जप्त)

पंतच्या नावावर दोन अर्धशतके जमा 

दिनेश कार्तिकनेही राजस्थान रॉयल्स विरुद्ध २ झेल आणि २ यष्टीचीतचे बळी मिळवले होते. रिषभ पंत या आयपीएलमध्ये चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. दीड महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना रिषभ पंतने (Rishabh Pant) यष्टीमागेही चांगली कामगिरी केली आहे आणि फलंदाजीतही त्याच्या नावावर २ अर्धशतकं जमा आहेत. त्याची सरासरी ३५ धावांची आहे आणि स्ट्राईक रेटही १५० च्या वर आहे. (IPL 2024 Rishabh Pant)

दिल्लीने गुजरातचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. यात दिल्लीचे गोलंदाज मुकेश कुमार, ईशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्ज चमकले. त्यांनी गुजरात संघाला सर्वबाद ८९ धावांमध्येच रोखलं आणि त्यानंतर हे आव्हान नवव्या षटकातच ४ गडी गमावत पूर्ण केलं. या विजयामुळे गुणतालिकतेही दिल्लीचा संघ सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर गुजरात संघाची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. (IPL 2024 Rishabh Pant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.