केंद्रीय निवडणूक आयोगाने (Supriya Sule) आता उमेदवारी अर्ज भरताना नियम कडक केले आहेत. निवडणुकीसाठी आता अर्ज भरताना उमेदवाराची काही वैयक्तिक माहिती देखील विचारण्यात येते. यामध्ये उमेदवाराची एकूण संपत्ती किती, उत्पन्न किती आणि कर्ज किती, याबाबतची माहिती विचारली जाते. तसेच उमेदवारांच्या कुटुंबियांच्या नावावर किती संपत्ती आहे, याची देखील माहिती प्रतिज्ञापत्रावर द्यावी लागते. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्यावर ५५ लाखांचं कर्ज असल्याचं सांगितलं आहे. (Supriya Sule)
(हेही वाचा –BJP: आता प्रत्येक आमदाराचं रिपोर्ट कार्ड तयार होणार, लीड देणार नाही त्याचं तिकीट धोक्यात; भाजपचे नवे धोरण)
आपण वहिनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि भाचा पार्थ पवार यांच्याकडून एकूण ५५ लाखांचं कर्ज घेतल्याची माहिती सुप्रिया सुळे यांच्याकडून प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याकडून २२ लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. तर सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही बँकेचं कर्ज सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी घेतलेलं नाही. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे या १४२ कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याला यंदा शेतीतून शून्य उत्पन्न मिळाल्याचं देखील नमूद केलं आहे. (Supriya Sule)
हे पहा –